- Breaking News

नागपुर समाचार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहीद गोवारी स्मारकावर श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहीद गोवारी स्मारकावर श्रद्धांजली

नागपुर समाचार : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी नागपूर येथील झिरो माईल्स परिसरातील गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन श्रध्दांजली वाहिली.

अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी आजच्याच दिवशी 23 नोव्हेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. दरवर्षी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून गोवारी बांधव या ठिकाणी अभिवादन सोहळ्याला उपस्थित असतात. आज 28 वा गोवारी शहीद स्मृती दिवस आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंत महाविद्यालयातील आपल्या कार्यक्रमानंतर ताफ्यासह शहीद स्मारकाला भेट दिली. स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. या दुर्घटनेत शहीद झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दटके, मोहन मते व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *