- Breaking News

नागपूर समाचार : अटल भूजल योजनेच्या माध्यामातून जिल्हयामध्ये पाणी जागरण मोहिम

अटल भूजल योजनेच्या माध्यामातून जिल्हयामध्ये पाणी जागरण मोहिम

नागपूर समाचार : भविष्यातील समृद्धी पाण्याच्या उपलब्धीवर राहणार आहे. त्यामुळे थेंब थेंब पाण्याचे महत्व समजून सांगण्यासाठी अटल भूजल योजना आली असून पाण्याचे व्यवस्थापन प्रत्येक माणसाची गरज असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. वर्षा माने यांनी केले आहे.

नागपूर जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अटल भूजल योजनेच्या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये पाणी जागृती निर्माण करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अनेक शाळांमध्ये या संदर्भातील जनजागरण सुरू आहे.

आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य पुणे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली भूजल सप्ताह निमित्य अटल भूजल योजनेची माहिती देण्यासाठी विविध स्पर्धाचे नियोजन करण्यात आले. शालेय मुलांना भूजल बदल माहिती देण्यात आली , पाणी बचतीच्या विविध उपाययोजना (ठिंबक / तूषार सिंचन) पध्दतीचा वापर करणे, जलसंधारण कामाच्या उपचार पध्दती यामध्ये (सिंमेट नालाबांध, मातीनाला बांध, सिसिटी, रिचार्ज शाफट इ.) पध्दतीचा वापर करून पाणी आडवीणे व जिरविणे या बदल माहिती देणेसाठी शालेयस्तरावर विविध स्पर्धाचे आयोजन करण्याबाबत नियोजन करण्यात आले. 

दिनांक १६ नोव्हेंबरला ग्रामपंचायत कार्यालय भीष्णूर, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर येथे अटल भूजल योजनेअंतर्गत वाटर लेवल इंडिकेटरची माहिती जलसुरक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली. शालेय जीवनापासून लहान मुलांना चांगल्या सवयी लागाव्या व घरच्या घरी पाण्याची बचत कशी करावी,याकरिता पाण्याचे महत्त्व सांगण्यात आले.सदर उपक्रमाला भूजल विकास यंत्रणा नागपूरच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डाँ. वर्षा माने व येथील स. भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शिक्षण संवाद व क्षमता बांधणी तज्ञ जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष निलेश खंडाळे, दर्शन दुरबूळे, प्रतीक हेडाऊ, मयूर दुहीजोड, ग्रामसेवक श्री फुके, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्र उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *