- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपुरातून निघणार भव्य बाईक रॅली; भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

नागपुरातून निघणार भव्य बाईक रॅली; भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

नागपूर समाचार : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात कन्याकुमारी पासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनली आहे. आणि दिवसेंदिवस पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद वाढतच जात आहे. 

भारत जोडो यात्रेचा मूळ उद्देश सध्य स्थितीत भारत देशात वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, सांप्रदायिकता, आणि राजनीतिक केंद्रीकरण याच्या विरोधात लढा देणे हा आहे. तब्बल 150 दिवसात भारताला उत्तर ते दक्षिण टोकापर्यंत जोडणारे कन्याकुमारी ते काश्मीर असा 3500 किलोमीटरचा प्रवास आणि 12 राज्यातून ही पदयात्रा जाणार आहे.

याच अनुषंगाने भारत जोडो पदयात्रे चे आगमन महाराष्ट्रात 7 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे होणार आहे. त्यासाठीच महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरभूमी वर घेऊन येण्यासाठी व राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनात आणि राष्ट्रिय युवक काँग्रेस चे महासचिव व नागपुर म. न. पा. चे मा. नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्त्वात नागपुर ते तेलंगणा (उदगीर) भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. बाईक रॅली मधे 5000 युवकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.कारण असंख्य युवक वाढत्या बेरोजगारी व महागाई मुळे त्रस्त झाले आहे आणि त्या विरोधात आवाज उठवण्यास एकत्रीत आले आहे.

बाईक रॅली चा आरंभ हा नागपुर, महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून होणार आहे. मग रॅली नागपुर , वर्धा, अर्णी होत तेलंगणा (उदगीर) येथे राहुल गांधी यांच्या *भारत जोडो यात्रा* मध्ये सहभागी होणार आहे. हा 450 किलोमीटर चा नागपुर ते उदगीर प्रवास बाईक रॅली द्वारे करण्यात येणार आहे. 

आणि मग तेथे राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभगी होऊन तेलंगणच्या भूमीवरून महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरभूमी वर घेऊन येण्याचे व महाराष्ट्रात नांदेड येथे भारत जोडो यात्रेचे स्वागत करण्याचे काम युवक काँग्रेस बाईक रॅली द्वारे करणार आहे. पुढे ही बाईक रॅली यात्रेत सहभागी होऊन संपूर्ण महाराष्ट्र प्रवास करेल.

बाईक रॅली माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय युवक काँग्रेस महासचिव व नागपुर मा. न.पा. मा. नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्त्वात करण्यात येत आहे.

नागपुर येथून रॅली चे उद्दघाटन भारतीय काँग्रेस कमिटी चे महासचिव मुकुलजी वासनिक, भारतीय काँग्रेस कमिटी चे महासचिव अविनाशजी पांडे, प्रदेश अध्याश नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनील केदार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, राजेंद्र जी मूळक, गिरीश पांडव, प्रफ्फुल गुडधे, आमदार अभिजीत वंजारी, पुरुषोत्तम हजारे, तानाजी वणवे यांच्या हस्ते होणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *