- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : वाडी-अमरावती महामार्गावर ट्रकखाली येऊन मजुराचा मृत्यू

ट्रकखाली येऊन मजुराचा मृत्यू

नागपूर समाचार : वाडी-अमरावती महामार्गावरील एमआयडीसी वळणावरील दिनेश टी स्टॉलजवळ दुपारी ३ वाजतादरम्यान आयशर ट्रकखाली येऊन मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती महामार्गावरून गोडाऊनमध्ये जात असताना चारचाकी आयशर ट्रक क्र. एम. एच. २१ / बी. एच. २२२८ दिनेश रेस्टॉरेंटजवळून वळण घेत असताना अचानक एक अज्ञात युवक हा चाकाखाली आला. ट्रकचालकाला काही समजण्याच्या आधीच त्याचे डोके चेंदामेंदा होऊन तो जागीच ठार झाला. परिस्थिती बघता ट्रकचालक गाडी सोडून पसार झाला. प्रत्यक्षदश्रींनुसार अज्ञात तरुण नशेत असल्यामुळे त्याचा तोल गेल्याने समजते.

घटनेची माहिती वाडी पोलिस स्टेशनला मिळताच पो. नि. प्रदीप रायन्नवार तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. अज्ञात इसमाचे शव उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय नागपूर येथे पाठविण्यात आले. अज्ञाताची ओळख पटविण्यात रात्री उशिरापर्यंत वाडी पोलिसांना यश आले नव्हते. पुढील तपास वाडी पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.