- खेलकुद , नागपुर समाचार

युवा दौड व मॅरेथॉन रविवारी खासदार क्रीडा महोत्सव २०२२

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या व देशात आदर्श ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रविवारी २२ मे २०२२ रोजी ५ किमी अंतराच्या युवा दौड आणि १० किमी, ५ किमी व ३ किमी अंतराच्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, युवा दौडमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचे बंधन नाही. यामध्ये सर्वांना सहभागी होता येणार आहे. रविवारी २२ मे रोजी सकाळी ६ वाजता यशवंत स्टेडियम येथून ५ किमी अंतराच्या युवा दौड ला प्रारंभ होईल.

युवा दौडमध्ये सहभागी होण्यासाठी http://yuvadaud.khasdarkridamahotsav.com/#/ या लिंकवर क्लिक करून नोंदणी करता येईल. १० रुपये नाममात्र नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. युवा दौडमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, नाश्ता आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेतील पहिल्या ५ हजार स्पर्धकांना पदक देउन सन्मानित करण्यात येईल. याशिवाय सर्वात कमी वयाचा मुलगा किंवा मुलगी यांना विशेष पुरस्कार दिले जाईल. तसेच आकर्षक वेशभूषेसाठी ३ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

इच्छूकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सीताबर्डी येथील हल्दीराम समोरील ग्लोकल स्कवेअर मॉल, रेशीमबाग चौकातील माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान कार्यालय, लकडगंज येथील गिरनार बँक सुभाष पुतळा, लक्ष्मीनगर येथील पूर्ती सुपर बाजार आठ रस्ता चौक, यूबीएसएस सी ००४ उज्ज्वल फ्लॅट्स, रहाटे कॉलनी वर्धा रोड, इनडोअर स्टेडियम विवेकानंद नगर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी ९७३०७५६२३६, ९७३०९५६७४७, ९७६७६२४१३५, ८०८७७०६४६९ आणि ९८२३५३१८९९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

 

१० किमी, ५ किमी आणि ३ किमी मॅरेथॉन

सहभागी होण्यासाठी २० मे पर्यंत करा नोंदणी

युवा दौड पूर्वी सकाळी ५ वाजता यशवंत स्टेडियम येथून मॅरेथॉनला सुरूवात होईल. खुल्या गटात पुरूषांसाठी १० किमी, खुल्या गटात महिलांसाठी ५ किमी आणि १६ वर्षाखालील मुलांसाठी ५ किमी अंतराची व मुलींसाठी ३ किमी अंतराची मॅरेथॉन होईल. १६ वर्षाखालील वयोगटात ३० मे २००६ नंतर जन्मलेल्या स्पर्धकांना सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५० रुपये नोंदणी शुल्क निर्धारित करण्यात आले असून २० मे २०२२ पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे.

विजेत्यांना एकूण ३ लक्ष ५० हजार रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. मॅरेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक गटातील पहिल्या दहा विजेत्यांना रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरूषांच्या १० किमी आणि महिलांच्या ५ किमी अंतराच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी प्रत्येकी २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १९ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला १७ हजार रुपये, चवथ्या क्रमांकासाठी १४ हजार रुपये, पाचव्या स्थानासाठी १२ हजार रुपये, सहाव्या क्रमांकाला १० हजार रुपये, सातव्या क्रमांकासाठी ९ हजार रुपये, आठव्या क्रमांकासाठी ७ हजार रुपये, नवव्या क्रमांकासाठी ६ हजार रुपये आणि दहाव्या क्रमांकासाठी ४ हजार रुपये पुरस्कार प्रदान करण्यात येतील. १६ वर्षाखालील मुले आणि मुलींना प्रत्येकी प्रथम क्रमांक १० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ७ हजार रुपये, तृतीय क्रमांक ५ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक ४ हजार रुपये, पाचवे क्रमांक ३ हजार रुपये, सहावे क्रमांक २ हजार रुपये आणि अनुक्रमे सातव्या ते दहाव्या क्रमांकासाठी प्रत्येकी १ हजार रुपये रोख पुरस्कार दिले जातील. याशिवाय सर्व गटातील ५ स्पर्धकांना १ हजार रुपये प्रोत्साहन पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे साधा संपर्क

ग्लोकल स्कवेअर मॉल, अभ्यंकर रोड, हल्दीराम समोर, सीताबर्डी

मो. ९१५८५७३३३९ (वेळ: सकाळी ११ ते सायं. ५)

पं. बच्छराज व्यास विद्यालय, मेडिकल चौक

मो. ८७६६९६५५७२ (वेळ: सकाळी ९.३० ते सकाळी ११)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मैदान

मो. ९९२२३५५४९८ (वेळ: सकाळी ११ ते सायं. ५)

अधिक माहितीसाठी सचिन देशमुख (९७६६८९३३८०), जितेंद्र घोडदेकर (९८२३०१६५२१), रामचंद्र वाणी (९५७९३७४५५४) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.