- नागपुर समाचार

पद्मश्री हेमा मालिनी द्वारा राधा-कृष्‍णाची रासलिला आणि होलिकोत्‍सव ने खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य समापन.

नागपूर, 24 मार्च:- ‘तो संग खेलूंगी, मै तो होरी’ म्‍हणत देखण्‍या राधेने आकर्षक, मनमोहक श्रीकृष्‍णाच्‍या अंगावर गुलाल फेकला आणि कृष्‍णाने पिचकारीने राधेवर रंगाची उधळण केली आणि एकच धमाल झाली. ब्रिजमध्‍ये गोपी-गोपिकांसोबत ‘बिरज मे धुम मची है होरी की’ म्‍हणत धुळवड साजरी झाली.

प्रसंग होता प्रसिद्ध अभिनेत्री नृत्‍यांगना पद्मश्री हेमा मालिनी यांचा ‘राधा रासबिहारी’ ही नृत्‍य नाटिकेचा. केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतील खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाच्‍या सहाव्‍या आणि समारोपाच्‍या दिवशी ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्‍ये हेमा मालिनी यांची ‘राधा रासबिहारी’ ही नृत्‍य नाटिका सादर करण्‍यात आली. मथुरेच्‍या खासदार असलेल्‍या हेमा मालिनी यांचे राधेच्‍या वेशात मंचावर आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी पुष्‍पवृष्‍टी करण्‍यात आली.

गणेशवंदनेने नृत्‍यनाटिकेला प्रारंभ करण्‍यात झाला. नदीवर पाणी भरावयास आलेल्‍या राधा व गोपिकांचे कृष्‍ण आणि त्‍याचे सवंगडी कसे खोडी काढतात, त्‍यांची मटके फोडतात, कंस वध, होळी असे अनेक हेमा मालिनी व त्‍यांच्‍रूा सहकार्यांनी नृत्‍याच्‍या माध्‍यमातून जीवंत केले.

समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार, जिल्‍हाधिकारी आर. विमला, डीसीपी विनिता साहू, ईश्‍वर देशमुख महाविद्यालयाच्‍या प्राचार्य शारदा नायडू, अपर्णा अमितेश कुमार, अॅड. सुलेखा कुंभारे, आमदार रामदास आंबटकर यांची प्रमुख उपस्‍थ‍िती होती. नितीन गडकरींच्‍या हस्‍ते हेमा मालिनी यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

नाट्य विहार कला केंद्राद्वारे प्रस्‍तुत ‘राधा रासबिहारी’ नृत्‍य नाटिकेचे नृत्‍य निर्देशक भूषण लखांद्री यांनी केले होते तर गीत व संगीत स्‍व. रवींद्र जैन यांचे होते. गायक कविता कृष्‍णमूर्ती, सुरेश वाडकर, रूपकुमार राठोड, पॅमेला जैन होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील यांनी केले आहे.

……………

कोविड नंतर आनंदाचे क्षण

कोविड सारख्‍या महामारीवर आपण पोलिस, डॉक्‍टर्स, नर्सेस, सामाजिक कार्यकर्ते यांच्‍यासारख्‍या कोरोना वॉरिसर्यमुळे विजय मिळवला. म्‍हणून आज आपल्‍याला या कार्यक्रमाचा आनंद घेण्‍याची संधी मिळाली, असे म्‍हणत नितीन गडकरी यांनी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाला नागपूरकरांनी उत्‍स्फूर्त प्रतिसाद दिला, त्‍याबद्दल त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले.

……..

Leave a Reply

Your email address will not be published.