- Breaking News, नागपुर समाचार, संत्रानगरी

नागपूर समाचार : सामान्य कष्टकरी महिला सर्वांची प्रेरणास्त्रोत असावी – विभागीय आयुक्त प्राजक्ता लंवगारे

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित् माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचा उपक्रम

नागपूर समाचार : सामान्य कष्टकरी महिला या घरातील काम करून कुटुंब सांभाळून मुलाबाळांना घडविण्यात समाजासाठी मोठे योगदान देत असतात. अशा महिला सर्वांसाठी प्रेरणा स्त्रोत असायला पाहिजे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी आज येथे केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्याा प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या अधिनस्थ असलेल्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्‍यूरो, नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेभशन, मध्यय रेल्वेथ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अजनी रेल्वे स्टेशन येथे आयोजित केलेल्या ’आंतरराष्ट्री य महिला दिन’ समारंभात त्या बोलत होत्या.

यावेळी मध्य रेल्वेच्या विभागीय नागपूर रेल्वे मंडळ व्यवस्थापक रिचा खरे, वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेच्या माजी प्राचार्या डॉ. लता लांजेवार, विभागीय कार्मिक अधिकारी सांची जैन, क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोचे सहायक संचालक हंसराज राऊत, अजनी रेल्वे स्टेंशनच्या व्यवस्थापक माधुरी चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

माझे स्वतःचे प्रेरणास्त्रोत सावित्रीबाई फुले, माझी आई आणि सामान्य कष्टकरी महिला असल्याचे सांगून विभागीय आयुक्त लवंगारे म्हणाल्या की, आपण ग्रामीण भागात काम केले असून या भागातील महिलांचे कष्ट जवळून बघितले आहे. त्यामुळे आपण कितीही मोठे झालो, तरी सामान्य, कष्टकरी महिला यांच्या योगदानाला विसरू नये. या महिला ख-या अर्थाने आपल्या घरात वेळ देऊन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन आपल्या सारखे अधिकारी घडविण्याचे मोठे कार्य करीत असतात. त्यामुळे अशा महिलांचा आपण कायमस्वरूपी सन्मान करणे आवश्यक आहे. त्यांचा सतत आपण आत्मविश्वास वाढविला पाहिजे, त्यांच्या संघर्षाला मदत करायला पाहिजे, असे सांगून त्यांनी उपस्थित महिला अधिकारी कर्मचा-यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विभागीय नागपूर रेल्वे मंडळाच्या व्यवस्थापक रिचा खरे म्हणाल्या की, अजनी रेल्वे स्टेशन हा संपुर्णपणे महिला अधिकारी व कर्मचारी असलेले एकमेव रेल्वे स्थानक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेत सुध्दा महिला काम करण्यात कुठेही मागे नाही. अनेक क्षेत्रात त्यांनी उत्तम काम केले आहे. महिला अधिकारी कर्मचा-यांनी असेच काम करत रहावे, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

डॉ. लता लांजेवार म्हणाले, महिला कठीण परिस्थीुत सुद्धा सर्व स्तररावर महत्वारच्या जवाबदा-या उत्कृेष्ठलपणे सांभाळत आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या्मुळे आज महिलांना हे स्थान प्राप्त झाले आहे. शिक्षणामुळे प्रगति होत असते. त्यामुळे सर्वांनी शिक्षणाला अधिक महत्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात रांगोळी स्पधर्धा, संगीत खुर्ची स्पंर्धा, पाककला स्प्र्धा घेण्यात आल्या. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना विभागीय आयुक्त लवंगारे व विभागीय नागपूर मंडळ रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उत्कृष्ठ काम करणा-या महिला अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात रंगधुन कलामंचाच्या कलापथकातील चमुने कार्यक्रमाचे सादरीकरण करून महिला दिनाचे महत्व समजावून सांगितले.

प्रास्ताविक क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरचे सहायक संचालक हंसराज राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ममता राव यांनी केले. तर आभार माला बेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नागपूरचे तकनीकी सहायक संजय तिवारी, संजीवनी निमखेडकर, नरेश गच्छककायला, निलेश अंभोरे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमात सुमारे 200 विद्यार्थी, रेल्वेतील महिला अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

स्पर्धेतील विजेत्यांची नावे : रांगोळी स्पवर्धेत उज्वीला थुतांग, खुशी हेलगे आणि सुनिता गौरकर यांना क्रमश: प्रथम द्वतीय आणि तृतीय पुरस्काेर, संगीत खुर्ची स्पखर्धेत त्रिशला लोणारे, लता यादव आणि शितल मंत्रि यांना क्रमश: प्रथम, द्वितीय आणि तृतीय तसेच पाक कला स्प र्धेत मिनाक्षी गायकवाड, प्रथम, भारती उइके द्वितीय आणि निशा शर्मा अणि सुजता चौधरी यांना तृतीय पुरस्कार मान्य्वरांच्या हस्ते पुरस्कार देउन सम्मानित करण्यातत आले.

Leave a Reply

Your email address will not be published.