नागपूर समाचार : भारतीय जनता युवा मोर्चा युवती आघाडीची नागपूर शहर व २० मंडळांची ऐतिहासिक कार्यकारिणी अधिकृतपणे गांधीबाग बगीचा मध्ये उत्साह पूर्ण वातावरणात जाहीर करण्यात आली.भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि युवा मोर्चा शहराध्यक्ष सचिन करारे यांच्या मार्गदर्शनात, तसेच नागपूर शहर युवती प्रमुख प्रशंसा प्रकाश भोयर यांच्या नेतृत्वात ही घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणी घोषणेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “भजन जॅमिंग” कार्यक्रमामध्ये उपस्थित युवतींना सकारात्मकतेचा मोलाचा संदेश मिळाला.
या कार्यक्रमाला युवतींनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर प्रचंड उत्साह आणि ऊर्जेने भरून गेला होता.”सध्याच्या काळात डावी विचारसरणी ज्या पद्धतीने नवीन पिढीची दिशाभूल करून त्यांना धर्म आणि राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहे, त्यापासून सावध राहा.
आपल्या टीमच्या सहकार्याने धर्म, संस्कृती, संस्कार आणि राष्ट्रवादाच्या स्थापनेसाठी उदंड सहकार्य करा. धर्मांतराबाबत समाजात जनजागृती करून समाजाचे रक्षण करा, असे आवाहन शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सर्वांना संबोधित करतांना केले.”येणारा काळ हा तरुणांचा आहे. आमची युवती आघाडी उत्तम युवा नेतृत्व तयार करण्याची कार्यशाळा बनेल, असा विश्वास सचिन करारे यांनी व्यक्त केला.””नव्या कार्यकारिणीबद्दल बोलताना नागपूर शहर युवती प्रमुख प्रशंसा भोयर यांनी स्पष्ट केले की, ही कार्यकारिणी प्रत्येक मंडळाला सक्षम नेतृत्व देणारी आहे.
या कार्यकारिणीच्या माध्यमातून शहरातील जास्तीत जास्त युवतींपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासोबतच, त्यांना पूर्णपणे संरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.सर्व युवती पदाधिकाऱ्यांना पक्षाचे दुप्पटे देऊन शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी,युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे,महामंत्री रितेश पांडे,रिषभ अरखेल यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
महानगर युवती आघाडीच्या पदाधिकारी म्हणून महानगर युवती प्रमुख प्रशंसा भोयर, सहयुवती योगिता बुर्डे,प्रतिक्षा घरडे, संपर्क प्रमुख अंकिता सामदले व कल्याणी कुंडे, सोशल मीडिया प्रमुख पल्लवी गिरोले आणि समन्वय पूर्व नागपूर अदिती लांजेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दक्षिण-पश्चिम नागपूरमधील धंतोली मंडळात युवती प्रमुख मीनल गहलोत, सहयुवती राधिका येले व चारुता डाबली, संपर्क प्रमुख मनीषा तामसकर आणि उपाध्यक्ष तन्वी कावडकर यांचा समावेश आहे.
त्रिमूर्ती मंडळात युवती प्रमुख श्रद्धा धावले, सहयुवती मोनू चतुर्वेदी व आंचल मिश्रा, संपर्क प्रमुख कोमल पराते आणि उपाध्यक्ष दिपिंती चुटे व मोनाली चुटे आहेत.
नरेंद्र नगर मंडळात युवती प्रमुख वेदांगी रोडे, सहयुवती मयुरी आनंदीकर व अपूर्वा शिरपूरकर आणि संपर्क प्रमुख आर्या कापसे यांची नियुक्ती झाली आहे.
सुभाष नगर मंडळात युवती प्रमुख मुस्कान शहू, सहयुवती प्रबोधिनी गायकवाड, आरुषी सिंगंधुपे व श्रुती ढोले, संपर्क प्रमुख सोमेश्वरी धोटे आणि उपाध्यक्ष सेजल रांघडाळा, गुंगुन महाडो, इशिका सिरामवार, प्रियांका धुर्वे, अश्विनी वानखेडे, वैष्णवी हार्डे, महिमा माडे, मिलिंदा विघ्ने, उत्कर्षा मसराम व गुंजन सोनारे यांचा समावेश आहे.
मध्य नागपूरमधील गांधीबाग मंडळात युवती प्रमुख रश्मी श्रीवास, सहयुवती एकता कुंभाळकर, सरोजिनी तिवारी व मंजुश्री गौर, संपर्क प्रमुख रुचिता कुंभाळकर आणि उपाध्यक्ष वैष्णवी चमत्कार, बरखा श्रीवास, तनुश्री कुंभाळकर, प्राची श्रीवास, जान्हवी चमत्कार, रश्मी डे व वंशिका तिवारी आहेत.
इतवारी मंडळात युवती प्रमुख वैभवी धामणकर तर महाल मंडळात युवती प्रमुख साक्षी खापर्डे, सहयुवती कोमल झाडहव व शर्वरी पाडेगावकर, संपर्क प्रमुख अंकिता जोशी आणि सहसंपर्क प्रमुख रेणुका व अमिषा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पूर्व नागपूरमधील वाठोडा मंडळात युवती प्रमुख मोना पराते, सहयुवती पारिका घुले, मयुरी गोमासे व खुशी वानखेडे, संपर्क प्रमुख तृषाणी धोसेवान आणि सहसंपर्क प्रमुख तनिषा धोटे आहेत.
वर्धमान नगर मंडळात युवती प्रमुख ज्योत्सना लोणारे व सहयुवती खुशी मोझदिलवार आहेत.
पारडी मंडळात युवती प्रमुख सुभद्रा कोरे, सहयुवती शीतल कोरे व रुपाली तुरकर, संपर्क प्रमुख सिद्धेश्वरी सरोदे, सहसंपर्क प्रमुख श्रुती बेहरे आणि उपाध्यक्ष निशा फुलणवार, पूजा वर्मा, तृप्ती लोणारे, रूपा टंडन, पल्लवी पचकाओडे, रुती फुकट, निकिता व मेघा शहू यांचा समावेश आहे.
दक्षिण नागपूरमधील अयोध्या मंडळात युवती प्रमुख स्वीटी गायकवाड, सहयुवती समृद्धी पाटील व अश्विनी तिबोले, संपर्क प्रमुख संस्कृती पाटील आणि उपाध्यक्ष ओंकारी भुगावकर आहेत.
हनुमाननगर मंडळात युवती प्रमुख अनुजा हजारे, सहयुवती चिरंजीता व भाग्यश्री महाडिक, संपर्क प्रमुख रुपाली ठाकूर आणि सहसंपर्क प्रमुख देवश्री दलाल आहेत. जानकी मंडळात युवती प्रमुख अर्चना बिनेकट, सहयुवती जुही पागरे व लीना शिंदे, संपर्क प्रमुख राशी सलोने आणि उपाध्यक्ष गौरी सराटकर आहेत.
उत्तर नागपूरमधील इंदोरा मंडळात युवती प्रमुख अर्पिता विष्णू, सहयुवती शिवानी उईके व मेघा मांडाडे, संपर्क प्रमुख शीतल दहाट आणि उपाध्यक्ष शीतल कडबे आहेत. कळमना मंडळात युवती प्रमुख दामिनी बोरकर, सहयुवती निधी हांडे व ईशा बोरकर आणि संपर्क प्रमुख पूजा लाखोरकर आहेत.
नारा मंडळात युवती प्रमुख वेदिका भगत व सहयुवती संजना चौधरी तर वैशाली नगर मंडळात युवती प्रमुख मीनल साखरे आहेत. पश्चिम नागपूरमधील धरमपेठ मंडळात युवती प्रमुख माहिरा जावडेकर, सहयुवती पलक पोतभरे व दिव्या नायर आहेत.
सुरेंद्रगड मंडळात युवती प्रमुख मिताली गाडिया आणि मानकापूर मंडळात युवती प्रमुख तृषा हिवाळे यांची नियुक्ती करण्यात आली असून या सक्षम कार्यकारिणीमुळे शहरात युवतींचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमुळे नागपूर शहरात युवतींच्या संघटन शक्तीला मोठी बळकटी मिळणार असून,सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग अधिक प्रभावी होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री महाडिक यांनी केले तर आभार योगिता बुरडे यांनी मानले.




