- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : क्रांतीजोती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कोसले माळी समाजाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर समाचार : श्री क्षत्रिय कोसले माळी समाज (विदर्भ) नागपूर विभागातर्फे, रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 सकाळी 9.30 ला दिघोरी नाक्याच्या मागे संजूबा हायस्कूल रोड, साईनगर उमरेड रोड नागपूर येथे भव्य शामियाण्यात क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला विदर्भतिल कोसले माळी समाज समाज बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 

 सावित्रीबाई चे समाजातील योगदान व त्यागाच्या मूर्तीमंत उदाहरणासह प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या, क्रांतीजोती भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहेत. आणि म्हणून आद्य मुख्याध्यापिका, शिक्षिका, विद्येची देवता म्हणून प्रत्येक शाळेतून, आणि खास करून स्त्री वर्गातून पूजनीय व्यक्तिमत्त्वाच्या सावित्रीबाईच्या जयंती निमित्त श्री क्षत्रिय कोसले माळी समाज विदर्भ नागपूर यांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्याचे ठरवले आहे.

 श्री क्षत्रिय कोसले माळी समाज विदर्भ नागपूर या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी दशकात संस्थेच्या यशस्वी वाटचालीच्या इतिहासात एक अक्षर ठेव म्हणून संस्था एक स्मरणिका प्रकाशित करणार आहे. या स्मरणिकेत माळी समाजातील गणमान्य व्यक्तींचे प्रेरणादायी लेख ,व त्यांची गरिबीतून झालेली वाटचाल, त्यांच्या जीवनात बहरलेले क्षण, कविता, हृदय दावक प्रसंग, इत्यादी साहित्य प्रकाशित होत आहे. आणि म्हणून या स्मरणीकेला “फुललेली बाग” हे साजेसे नाव देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात येणार आहे. 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात, समाजातील विविध क्षेत्रात विशिष्ट कामगिरी करणाऱ्या, गौरवशाली व्यक्तिमत्त्वाचा “समाज गौरव” या पुरस्काराने सन्मान होणार आहे. विदर्भातील समाजसेवकाचा सत्कार करण्यात येईल. त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, विचारांची देवाण-घेवाण, अशा या विविध अंगी नटलेल्या सावित्रीबाईंच्या जयंती निमित्त घेण्यात येणाऱ्या आहे.

मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, प्राचार्य एस व्ही पी सी इ टी नागपूरचे डॉक्टर विजय वाढई सर, उद्घाटक असतील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर सौ. अभिलाषा गावतुरे चंद्रपूर, तर प्रमुख उपस्थितीमध्ये बबनराव निकुळे, डॉ. राकेश गावतुरे, सुनंदाताई नाल्हे, डॉ.अलकाताई बी. झाडे, प्रतीक्षा गुरनुले, मनोहर चलपे, आणि या जयंती कार्यक्रमाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष कृष्णा महादुरे, उपाध्यक्ष जयंत लेंडे, सचिव ईश्वर ढोले, सहसचिव रंजीत सोनुले, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम मांदाडे, अलका शेंडे, सुहास चहारे, आशिष चौधरी, विजय सोनुले, श्रीकांत मोहुर्ले, विजय निकुळे, राजेंद्र वाटगुरे, राहुल वाढई या संचालक मंडळीच्या अथक परिश्रमातून सावित्रीबाईंचा जयंती सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान संचालक मंडळांनी केले.