- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपुरातील देवघर मोहल्ल्यातील साई गारमेंट्सला भीषण आग; व्यावसायिक इमारत जळून खाक

नागपूर समाचार : देवघर मोहल्ल्यातील जगन्नाथ बुधवारी परिसरात असलेल्या साई गारमेंट्स या चार मजली व्यावसायिक संकुलाला आज पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अरुंद गल्लीत असलेल्या या इमारतीत आग वेगाने पसरली असून दुकानातील संपूर्ण माल आगीत जळून खाक झाला आहे. 

मुख्य रस्त्यापासून सुमारे ६०० रनिंग फूट अंतरावर ही इमारत असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यात अडचणींचा सामना करावा लागला. तरीही अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक तास प्रयत्न सुरू ठेवले.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.