- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : (मेयो) इदिरा गांधी अस्पताल चतुर्थ वर्ग मनोहर झांबरे पेन्शन पासून वंचित

नागपूर समाचार : मेयो हॉस्पिटलमध्ये गेल्या २५ वर्षे कामगार म्हणून सेवा दिलेल्या मनोहर झांबरे यांना निवृत्तीनंतर दोन वर्षापासून पेन्शन मिळत नाही. पत्रकार परिषदेत त्यांनी न्याय मागितला असून, मेयो कामगारांच्या वारसांना नोकरी नाकारली जात असल्याचा आरोप केला.झांबरे यांचे निवृत्तीचे प्रश्नमनोहर झांबरे यांनी सांगितले, “मी २५ वर्षे मेयो हॉस्पिटलमध्ये कामगार म्हणून झटलो.

दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालो, तरी पेन्शन मंजूर झालेली नाही. मला थांबलेली दोन वर्षांची पेन्शन तात्काळ द्यावी.” त्यांनी पुढे सांगितले की, हॉस्पिटलने आजपर्यंत कोणत्याही कामगाराच्या वारसाला नोकरी दिलेली नाही.वारस नाथिनला नोकरीची मागणीझांबरे यांच्या परिवारातील सुशिक्षित नाथिनला नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली. “माझ्या वारसामध्ये नाथिनला मेयो हॉस्पिटलमध्ये नोकरी द्यावी, ही आमची न्याय्य मागणी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. मेयो हॉस्पिटल प्रशासनाने यापूर्वी अशा मागण्या नाकारल्याचा इतिहास असल्याचेही नमूद केले.

पालकमंत्र्यांना निवेदन प्रकरणात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे महसूलमंत्री मा. चन्द्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले असले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. पत्रकार परिषदेत झांबरे यांनी सांगितले, “मंत्री साहेबांना माहिती दिली, पण अद्याप न्याय मिळाला नाही. आता पत्रकारांच्या माध्यमातून लढा देऊ.” मेयो हॉस्पिटल व्यवस्थापनाने तात्काळ पेन्शन व नोकरीसंबंधी निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.