नागपूर समाचार : विदर्भ कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थ वाणिज्य शिक्षक मंडळ सन २०२५ मध्ये रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करत असून, १९ व २० डिसेंबरला नागपुर येथे भव्य चर्चासत्राचे आयोजन करत आहे. नागपुर विभागातील सहा जिल्ह्यांतून ३५०-४०० शिक्षकांचा सहभाग अपेक्षित आहे.चर्चासत्राचा उद्देशमंडळाची स्थापना २००० मध्ये झाली असून, गेल्या २५ वर्षांत मा. शिक्षण उपसंचालक कार्यालयासोबत संयुक्त चर्चासत्रे घेतली. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये संशोधनवृत्ती व चिकित्सक विचारसरणी वाढवणे हा मुख्य हेतू आहे, ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो.
पहिल्या दिवसाचा कार्यक्रम (१९/१२/२०२५)महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, रेशीमबाग चौक, उमरेड रोड येथे शुकवार-शनिवार चर्चासत्र. उद्घाटक मा. वेदप्रकाशजी मिश्रा, प्रमुख अतिथी मा. डॉ. पंकजजी भोयर (शिक्षण राज्यमंत्री), विशेष अतिथी मा. सुधाकरजी अडबाले (शिक्षक आमदार), स्वागताध्यक्ष मा. डॉ. मिलिंदजी बारहाते (कुलगुरू, राष्ट्रसंत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ), मुख्य पाहुणे मा. डॉ. माधुरी सावरकर (शिक्षण उपसंचालक, नागपुर). अध्यक्ष प्रा. मधुकरराव बोरकर. विशेष व्याख्याने: देवाजी तोफा (जल-जंगल-जमीन), राज. एस. मदनकर (पर्यावरण), ऐश्वर्य गाठे (AI).
दुसऱ्या दिवसाचा समारोप (२०/१२/२०२५) प्रमुख पाहुणे मा. नितीनजी गडकरी (केंद्रीय मंत्री), मा. उल्हास औरंगाबादकर (माजी सहसॉलिसिटर जनरल), विशेष अतिथी मा. अॅड. अभिजीतजी वंजारी (आमदार), मा. डॉ. शिवलिंगजी पटवे (विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष), मा. डॉ. अविनाशजी बोर्डे (अमरावती विद्यापीठ). विशेष व्याख्याने: डॉ. श्रीनिवास खांदेवाले (अर्थतज्ज्ञ), श्रीमंतजी माने (लोकमत संपादक), प्रमोदजी बोंडे (नुवामा वेल्थ), डॉ. अंकेश शाहू (नवीन शैक्षणिक धोरण).मंडळ अध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर, सचिव डॉ. चेतन हिंगणेकर, उपाध्यक्ष डॉ. गजानन धांडे, संयोजक डॉ. अंकेश शाहू यांनी सर्व शिक्षकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.




