- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूर येथे राज्याच्या आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला कार्याचा सखोल आढावा

उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते गौरव

नागपूर समाचार : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाची विभागीय बैठक आरोग्य मंत्री ना. श्री. प्रकाश आबिटकर , आरोग्य राज्य मंत्री ना श्रीमती. मेघना सकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील एम्स (AIIMS) ऑडिटोरियममध्ये घेण्यात आली.

जिल्हास्तरीय तालुकास्तरीय अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आरोग्य योजनांचा आढावा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मा. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर मंत्र्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य योजना व कार्याचा व आढावा घेण्यात आला . आरोग्य सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, विभागातील प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी आणि आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला.

राज्यमंत्री ना.मेघनाताई साकोरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कार्याची माहिती घेतली व सहभागी अधिकारी कर्मचारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी विभागाच्या प्रगतीचा व्यापक आढावा घेऊन भविष्यातील धोरणात्मक कार्यासाठी व आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी मार्गदर्शन केले.

आरोग्य सचिव ई. रवींद्रन, यांनी कुष्ठरोग कार्यक्रमाचा सखोल आढावा घेतला आणि या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर दिला.

आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबडेकर , संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आरोग्य विभागाच्या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांची माहिती घेतली आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना केल्या.

डॉ. शशिकांत शंभरकर, उपसंचालक, आरोग्य विभाग नागपूर यांनी नागपूर विभागातील आरोग्यविषयक परिस्थितीचा आणि विभागाने केलेल्या कामांचा तपशीलवार सादरीकरण केले.

या कार्यशाळेत नागपूर विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या महत्त्वाच्या आढावा बैठकीला नागपूर विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच सर्व जिल्हास्तरीय कॉर्डिनेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते.