नागपुर समाचार : भारतीय जनता पार्टी (भाजपा), नागपूर महानगर – चार्टर्ड अकाउंटंट (CA) आघाडीच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा (Installation Ceremony) आज, गुरुवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी हॉटेल द्वारकामाई, गणेशपेठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सी.ए. सेलच्या नवीन टीमने अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
या सोहळ्याला भाजपा शहर अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष श्री. संदीप भेंडे, माजी आमदार श्री. अनिल सोले आणि श्री. श्रीकांत आगलावे चेतना ताई टांक प्रामुख्याने उपस्थित होते. सीए आघाडी मधील जवळपास 50 पदाधिकाऱ्यांना यावेळी जबाबदारी देण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा देण्यात आल्या.दयाशंकर तिवारी यांनी “सीए हे देशाच्या पाठीचा कणा असुन देशाच्या आर्थिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात” असे गौरवउद्गार काढून नव्या कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या
सीए आघाडी अध्यक्ष संदीप सुरांना यांनी सर्वांनी सामूहिक आणि एकात्मिक पद्धतीने काम करून देशाच्या विकासात हातभार लावूया असे आवाहन करून सी.ए. क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आणि पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी सीए आघाडीचे पालक श्री. आशिष मुकीम आणि आघाडी अध्यक्ष श्री. संदीप सुराणा उपस्थित होते. तसेच आघाडीचे महामंत्री श्री. संदीप जोधवानी, श्री. स्वप्नील घाटे, श्री. यश वर्मा आणि श्री. श्रीकांत दुबे यांच्यासह सी.ए. क्षेत्रातील अनेक मान्यवर व सदस्य या सोहळ्याला उपस्थित होते.




