शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात संपर्क करावा
नागपुर समाचार : निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्रभागाचे आरक्षण सुद्धा निश्चित झाले आहे. मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पूर्व विदर्भ संघटक व संपर्कप्रमुख किरण पांडव, विधान परिषद आमदार कृपाल तूमाने यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले आहे. तरी नागपूर शहर महानगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी, तसेच महिला उमेदवारांनी १० डिसेंबर पर्यंत अर्ज भरून द्यायचे आहे.
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्रीखंडे हॉस्पिटलच्या बाजूला अजनी नागपूर सकाळी 12 ते 3 या दरम्यान अर्ज स्वीकारले जातील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग, महिला इतर सर्व प्रवर्ग इच्छुक उमेदवारांनी जिल्हाप्रमुख सुरज गोजे, जिल्हाप्रमुख सौ. मनीषा पापडकर यांच्या मोबाईल क्रमांकावरील संपर्क करावा.
सौ. मनीषा पापडकर जिल्हाप्रमुख शिवसेना, नागपूर – 8793452575




