गडचिरोली समाचार : नवेगाव (मुरखळा) अहेरी येथील अल्पसंख्यांक आघाडीचे ज्येष्ठ सामाजिक नेते रियाजभाई शेख यांच्या कन्येच्या विवाह सोहळा नवेगांव (मुरखळा) काॅम्पलेक्स येथील प्रसन्ना सेलिब्रेशन हॉल येथे संपन्न झालेल्या या शुभ सोहळ्याला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी हजेरी लावून नववधू-वरांना मनःपूर्वक आशीर्वाद दिले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र चंदेल, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा शिवसेना प्रमुख महेश केदारी, शिवसेना नेते वासुदेव शेडमाके, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री सलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते जावेद अल्ली तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन, स्नेहभावाची वातावरणनिर्मिती आणि मान्यवरांचे आशीर्वाद यामुळे विवाह समारोह अविस्मरणीय ठरला.




