- Breaking News, नागपुर समाचार, मनपा, सम्मानित

नागपुर समाचार : उत्कृष्ट सेवेसाठी ‘आपली बस’च्या वाहकांचा गौरव; मनपातर्फे १८ कर्मचाऱ्यांना सन्मान

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ विभागातर्फे प्रवासी सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाहकांचा कौतुक सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्यामध्ये प्रशंसनीय कार्य करणाऱ्या विविध डेपोमधील वाहकांना सन्मानित करण्यात आले.

शहरातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि प्रवासी-स्नेही बस सेवा पुरवण्यात वाहकांचे समर्पण, शिस्त आणि बांधिलकी महत्त्वपूर्ण आहे. या योगदानाची दखल घेऊन हा गौरव समारंभ पार पडला. याप्रसंगी मनपा परिवहन व्यवस्थापक श्री. राजेश भगत, मनपा प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे आणि चलो मोबिलिटी प्रा. लि.चे सिटी हेड श्री. अजय कुमार उपस्थित होते.

प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुलभ बससेवा सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वाहकांचा सत्कार करण्यात आला. यात पाटवर्धन डेपो येथील अर्चना गोरे सुजल मोखारे, खापरी डेपो येथील ज्योती राजेश कामदे, ईश्वर तोहने, वाडी डेपो येथील राजकुमार मदनलाल सहारे, शुभम रामभाऊ पंचभाई, वाठोडा डेपो येथील राणू शेंडे, निलेश शेंबेकर, हिंगणा डेपो येथील श्रीकृष्ण गजभिये, बॉबी खैरकर यांना सत्कार करण्यात आला.