नागपूर समाचार : नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासावर आधारित सहा पुस्तकांचा भव्य प्रकाशन सोहळा शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी सायं. 6:30 वाजता महालातील सिनियर भोसला पॅलेस येथे पार पडणार आहे. या सोहळ्याचे आयोजन महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट व लाखे प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात उदय जोशी लिखित चार ऐतिहासिक कादंबऱ्या – आदिपर्व, संघर्षपर्व, कलहपर्व, हासपर्व तसेच डॉ. भालचंद्र हरदास लिखित महालची भ्रमंती व धर्मभूषण श्रीमंत राजे लक्ष्मणराव महाराज भोसले या दोन ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे.
पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते होणार असून, प्रमुख उपस्थिती परमपूज्यनीय आचार्य जितेंद्रनाथ स्वामी महाराज, श्रीनाथ पीठाधीश्वर, अंजनीग्राम-सुर्जी यांच्या लाभणार आहे.
महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत डॉ. राजे मुधोजी महाराज भोसले व प्रकाशक चंद्रकांत लाखे यांनी नागपूरकर नागरिक, इतिहासप्रेमी व साहित्यरसिकांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव उपस्थितांनी 20 मिनिटे अगोदर पोहोचावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. पार्किंग व्यवस्था डी. डी. नगर शाळेत उपलब्ध आहे.




