- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपूरच्या बजरंग नगरमध्ये नवरात्री महाप्रसाद सोहळा भव्य उत्साहात

नागपूर समाचार : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बजरंग नगर श्री सार्वजनिक हनुमान मंदिर व महालक्ष्मी पंचकमिटी तर्फे आयोजित महाप्रसाद सोहळा महानवमीच्या दिवशी भक्तिभावाने संपन्न झाला. याप्रसंगी (शिंदे गट) शिवसेना विधानपरिषद आमदार कृपाल तुमाने व भाजपाचे माजी नगरसेवक संदीप गवई यांनी देवीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. नवरात्रीच्या पावन पर्वावर शहरात भक्ती, उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार तुमाने यांनी विविध मंडळांमध्ये जाऊन माँ दुर्गा व माँ लक्ष्मी मातेचे दर्शन घेतले व समाजहित, जनकल्याण तसेच विकासासाठी प्रार्थना केली. मंडळ पदाधिकाऱ्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ अर्पण करून सत्कार केला.

बजरंग नगरातील गल्ली क्रमांक 2 मानेवाडा रोड येथे आयोजित या महाप्रसाद सोहळ्याचा लाभ भाविकांनी घेतला. कार्यक्रमात उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकजभाऊ इटणकर, प्रेम (हितेश) मुंदाफळे, मुकेश भंडारी, अभय कानझोडे, प्रकाश काळे, सुनील वाल्दे, सुधीर इटणकर, प्रवीण इंगोले, मुकेश भंडारी, पांडुरंग आष्टणकर,राहुल हेडाऊ, संजय भंडारकर, प्रतीक सोमलकर, मंगेश काटोले, दिवाकर दुबे, विनायक अंजकर, शेषराव आस्टणकर, रत्नाकर कातूळवार, लक्ष्मीनारायण ठाकूर, नामदेव वैध, रामराव तावरे,गुणवानराव सहारे, प्रकाश काटे, महेश बोरिकर, रवीश दिवे, अरविंद पावडे,

राजेंद्र श्रीवास, श्रीकांत फुके, मुकेश तिडके, प्रमोद घुबडे, रुस्तम कानझोडे, प्रभाकर येवले, राजू भांडेकर, धनराज सोमलकर, जितेंद्र लोंढे, राजू गोमासे, शंकर सिंघणझोड, महेश चांडक, ईश्वर चुनारक, हरीश राजूरकर, सचिन लटारे, गुणवंतराव सहारे,सचिन डोये, प्रियंका कानझोडे, प्रणाली दिवे, रेखा माहुरे, मंदा सिंघणझोडे, नीलिमा इटणकर, नीलिमा भांडेकर, जयश्री लटारे, अर्पिता भोयर, प्रिया मुंदाफळे, रितू रेवतकर, श्रद्धा भंडारे, कुसुम दुबे, नंदा आस्टणकर, कविता आस्टणकर, शिल्पा आस्टणकर, प्रेमीला आस्टणकर, दीपिका आस्टणकर, प्रियंका आस्टणकर, अनिता तायवाडे, नीलिमा वासणकर, ओयेकर, फुलझले, सारिका लोंढे, राऊत, प्रतिभा काटे, आशा घोडे, विना नानोटे, भांडेकर, कार्यकर्तानां सदिच्छा भेट देऊन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.

या प्रसंगी शहरातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, बंधू-भगिनी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार कृपाल तुमाने यांनी नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यकर्त्यांशी विविध सामाजिक विषयांवर चर्चा केली.