नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.रविवार आणि सोमवार (ता.28 आणि 29) रोजी शोध पथकाने 100 प्रकरणांची नोंद करून 72,600 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 24 प्रकरणांची नोंद करून 9,600 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रू.200 चे दंड वसुली करण्यात आली.
दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रू.4,400 चे दंड वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून15,000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 42 प्रकरणांची नोंद करून 8,400 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून रु. 9,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे.हरित लवाद यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे विवाह सभागृह इत्यादी ठिकाणी 1 प्रकरणाची नोंद करून रू.25,000 दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
उपद्रव शोध पथकाने झोन अंतर्गत कारवाई केली
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत उदय माहुरकर यांनी सी अँड डी कचरा रस्त्यालगत टाकल्यामुळे रू.5,000 चे दंड वसुल करण्यात आले.
धरमपेठ झोन अंतर्गत मे.हर्षल बिल्डर्स अँड डेव्लपर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रु.१०,००० दंड वसूल करण्यात आले.
हनुमाननगर झोन अंतर्गत मे.ब्लॅक हेड फॅशन आणि मे.ओमकार एन एक्स यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने प्रत्येकी रू. 5,000/-या प्रमाणे रू. 10,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच श्रावण चापके यांनी रस्त्यालगत झाडाच्या फांदया मोठ्या प्रमाणात कापल्याने रू.5,000 दंड वसुलकरण्यात आले.
गांधीबाग झोन अंतर्गत मे. हिंगणे किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000 चे दंड वसूल करण्यात आले.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अशोक किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/-चे दंड वसूल करण्यात आले.
मंगळवारी झोन अंतर्गत मे. उडुपी गोकुला रेस्टॉरेंट यांनी चेंबरमध्ये उरलेले अन्न टाकून व अनधिकृतरित्या आउटलेट पाईप जोडल्यामुळे रू.25,000 दंड वसुल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू. 75,000 दंड वसूल केला.




