अनेक भक्त आपल्या मनोकामना घेऊन माता जगदंबेचे दर्शन
कोराडी समाचार : श्री. महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी, अनेक भक्त आपल्या मनोकामना घेऊन माता जगदंबेचे दर्शन करत आहेत। नवरात्रि उत्सवात, भक्त मोठ्या संख्येने कोराडी मंदिरात येऊन आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी मातेची पूजा आणि दर्शन घेत आहेत।

तसेच मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे। भक्तांना मातेचे दर्शन करीता कमी दरात दर्शन पास उपलब्ध करण्यात आले आहे। बाहेरून आलेल्या भाविकांना राहण्याची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे।

गरोदर महिलांना तसेच वयोवृद्ध व्यक्तींना विल चेअर ची व्यवस्था करण्यात आले आहे जेणे करून भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होतो कामा नये याची गांभीर्याने काळजी घेण्यात आली आहे।
मंदिर परिसरात दवाखाने देखील उपलब्ध करण्यात आले आहे तसेच बाहेरून आलेल्या भाविकांना वाहतूक सेवा देखील उपलब्ध करण्यात आली आहे।




