- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : कामठी रमानगर रेल्वे उडानपुलाचे लोकार्पण धम्मचक्र दिनापूर्वी करावे – ॲड. सुलेखाताई कुंभारे

कामठी समाचार : विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देश-विदेशातुन हजारोच्या संख्येनी दररोज अनुयायी भेट देत असतात. धम्मचक्र प्रवर्तण दिनाच्या प्रसंगी ८ ते १० लाख अनुयायी दिक्षाभुमी ते ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला दर्शनासाठी येत असतात हे सर्व अनुयायी बस, चारचाकी वाहणे व दुचाकी वाहणाने प्रवास करतात.

कामठी वरून ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला येण्याकरिता रेल्वे अंडरपास तयार करण्यात आला आहे. परंतु रेल्वे अंडरपास मधुन गोठ्या बसेस येवू शकत नाही तसेच मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे कामठी मार्ग पूर्ण पणे एकेरी करण्यात आलेला आहे. कामठी जयस्तंभ चौक ते रमा नगर रेल्वे मार्गावर आर.ओ.बी. (रेल्वे ओवर ब्रिज) तयार करण्याचे काम मागील ७ वर्षापासुन रखडलेले असल्यामुळे तो मार्ग सुध्दा बसच्या वाहतुकीसाठी अडथळा ठरला आहे.

रमा नगर उडाण पुलाचे रखडलेले बांधकाम त्वरीत पूर्ण करण्याकरिता बहुजन रिपब्लिकन एकता मंच द्वारे मा. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार मा. नितीनजी गडकरी साहेबांनी दि. १२ जुलै २०२५ रोजी संबंधीत विभागाचे अधिकारी व नागपुर जिल्हयाचे पालकमंत्रींच्या उपस्थितीत बैठक घेतली होती व रमा नगर उडाण पुलाचे बांधकाम करणा-या ऐजंसीची चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी तसेच उडान पुलावे काम पूर्ण करून धम्मचक्र प्रवर्तन दिनापूवी लोकार्पण करावे असे निर्देश संबंधीत विभागाला देण्यात आले होते.

या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन २ ऑक्टोंबर २०२५ रोजी असुन लाखो अनुयायी धम्मचक प्रवर्तन दिनाच्या दोन दिवस आधी पासुनच दिक्षाभुमी ते ड्रॅगन पॅलेस असा प्रवास करीत असतात.

सद्या कामठी येथे मेट्रो चे बांधकाम सुरू असल्यामुळे कामठी ते ड्रॅगन पॅलेस अंडरपास हा मार्ग एकेरी करण्यात आला आहे. त्यामुळे त्या मार्गावरून लाखो अनुयायींना आपल्या वाहनासह येण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच मोठ्या बसेस व सिटी बसेस सुध्दा ड्रॅगन पॅलेस परिसरात येवू शकत नाहीत त्यामुळे रमा नगर उडाण पूलाचे बांधकाम त्वरीत पूर्ण करून २५ सप्टेंबर २०२५ पूर्वी उडाणपूल वाहतुकीकरिता सुरू करण्यात यावा असे आवाहन ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्याद्वारे करण्यात आले आहे धम्मचक्र प्रवर्तण दिनापूर्वी स्मा नगर रेल्वे उडाण पुल वाहतुकीसाठी सुरू न झाल्यास बहुजन रिपब्लिकन एकता मंच द्वारे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ही इशारा प्रशासनास देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *