नागपूर समाचार : शनिवारी ५ जुलै रोजी नुकत्याच झालेल्या भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात दक्षिण नागपूर शहर परिसरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयातील 8, 9, 10 आणि 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला माजी नगर सेविका सौ. मंगलाताई खेकरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.विवेक नानोटी संचालक प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सायंटिस्ट अजिंक्य कोत्तावार या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सरस्वती स्तवन विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केले. या प्रसंगी विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करून मार्गदर्शन केले.
सायंटिस्ट अजिंक्य कोत्तावार यांनी विविध क्षेत्रातील माहिती दिली आणि विध्यार्थीना प्लॅन A, B, C असे करिअर ऑपशन ठेवा असे सांगितले आणि डॉ.नानोटी यांनी सुद्धा आयुष्यात संघर्ष करून यश मिळवण्यासाठी मुलमंत्र दिला. दक्षिण नागपुरच्या माजी नगर सेवीका सौ. मंगलाताई खेकरे यांनी अभिनंदन करित सोहळ्याचे भरभरून कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना कायम स्वरूपीं सकारात्मक विचारसरणी ठेवून पुढे जावे असे मोलाचे मार्गदर्शन केलेत. कार्यक्रमांच्या दुसऱ्या भागात सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी निमंत्रण पालक आणि विद्यार्थ्यांना मेजवानी देण्यात आली. रँकर्स हबच्या अभिनंदन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रस्तावना डॉ. दीपक निपाने यांनी केले तर संचालिका सौ. पूनम दीपक निपाने यांनी आभार मानले. तसेच शाखा व्यवस्थापक निखिल मार्गमवार, मिस तायडे, मिस अनामिका मेश्राम, मिस राशी बरडे, हर्षल लेंडे, सुशील जाधव या सगळ्यांनी सहभागी होऊन सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण रँकर्स हब च्या चमूने अथक परिश्रम घेतलेत.