रामटेक समाचार : श्रावन महिण्याच्या पहिल्या सोमवारी दि. २८ जुलै रोजी दु. ३.०० वाजता विधिवत पुजा-अर्चना करून रामधाम येथील बर्फानी बाबा अमरनाथ चे कपाट महंत महात्यागी छोटे बालकदास बाबा यांच्या हस्ते उघडण्यात आले. यानिमित्त रामधाम येथे यज्ञ, हवन तसेच दिवसभर विभिन्न भजन मंडळद्वारे भजन किर्तनाचा कार्यक्रम करण्यांत आला. हजारो भक्तगणांनी बाबा अमरनाथची गुफा व बाबा अमरनाथ बर्फानी शिवलिंग चे दर्शन घेतले.
प्राकृतिक व मानव निर्मित विपत्तींना सामोरे जाऊन देखील श्रध्दालु बाबा अमरनाथची यात्रा करीत आहेत, जे धर्मप्रिय भक्त बाबा अमरनाथच्या यात्रेस काही कारणास्तव जाऊ शकत नाही, त्यांची इच्छा असते कि, कदाचित येथेच जवळपास बाबा अमरनाथचे दर्शन झाले तर त्यांचे मनुष्य जिवन सार्थक होईल. तेव्हा असंख्य भक्तांच्या इच्छेच्या पुर्ततेकरीता चंद्रपाल चौकसे यांनी मनसर येथील प्रख्यात रामधाम तिर्थ येथे बाबा बर्फानी अमरनाथ धाम ची स्थापना केली.
या वर्षी १४ वर्ष पुर्ण होत असुन प्रत्येक श्रावन मासच्या पर्वामध्ये भक्तगण येथे मोठ्या संख्येने येतात व भगवान भोलेनाथ यांच्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन धन्य धन्य होवून धर्म भावनेत ओतप्रोत होतात. बाबा बर्फानी शिवलिंगाची दिव्य अनुभूती अनेक भाविकांना यावेळी होते. या ठिकाणी भक्तांना स्वर्गीय पवित्रतेचा दिव्य आभास होत असतो. महंत महात्यागी छोटे बालकदास बाबा यांचे स्वागत व सत्कार रामधाम तिर्थचे प्रणेते चंद्रपाल चौकसे व संध्याताई चौकसे यांनी केले. यावेळी पि.टी. रघुवंशी, मितारामजी सव्वालाखे, चंद्रशेखरजी भोयर, अनिल वाघमारे, राहुल पिपरोदे, बबलु दुधबर्वे, मोहन कोठेकर, ज्ञानसिंग गयगये, मारोती आत्राम, संतोश बोरीकर, दिलिप मानकर, अर्चनाताई पेटकर, दिलिप चौकसे, मंगेश कठौते, रितेश कुंभरे, सोनम मुदलियार यांचेसह अनेक भक्तजन उपस्थित होते.
रामधाम येथे भाविकांना एकाच ठिकाणी बाबा अमरनाथ, द्वादश ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, माता वैष्णोदेवी आणि विश्व प्रसिध्द ओम च्या दर्शनासोबतच भगवान राम आणि भगवान कृष्णाच्या जिवनावरील झांकी पहायला मिळते. यासोबतच मनोरंजन करिता जादुचे खेळ, अनेक प्रकारचे झुले, सुवी बर्ड पार्क, ॲडव्हेंचर पार्क सोबतच लाईट हाऊस वॉटर पार्क व जलपरी शो चे आनंद घेऊ शकतात. भारतीय संस्कृति, संस्कार चे संपूर्ण दर्शन रामधाम तिर्थ क्षेत्रात होते