नागपुर समाचार : दिनांक २८/०७/२०२५ नागपुर ग्रामीण जिल्हयात उप विभागिय पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या उपविभागातील गावांना भेटी देवुन तेथील नागरिकांची ग्रामसभा घेतली.
पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी अंतर्गत दिपक अग्रवाल, सहा पोलीस अधिक्षक तथा उप विभागिय पोलीस अधिकारी, नागपुर उपविभाग यांनी टाकळघाट या गावाला भेट देवुन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली. पोलीस स्टेशन भिवापुर अंतर्गत वृष्टी जैन, सहा पोलीस अधिक्षक तथा उप विभागिय पोलीस अधिकारी, उमरेड उपविभाग यांनी नक्षी गाव येथे भेट देवुन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली. पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत संतोष गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी, कन्हान उपविभाग यांनी गहुहिवरा गाव येथे भेट देवुन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली.
पोलीस स्टेशन काटोल अंतर्गत बापु रोहोम, उपविभागिय पोलीस अधिकारी, काटोल उपविभाग यांनी रिधोरा गाव येथे भेट देवुन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली. पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत रमेश बरकते उपविभागिय पोलीस अधिकारी, रामटेक उपविभाग यांनी हिवरा पथरई येथे भेट देवुन ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली.
सदर ग्रामसभेला उपविभागिय पोलीस अधिकारी यांच्या सह संबधीत पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी आणि तेथील अंमलदार हजर होते. ग्रामस्थांची ग्राम सभा घेवुन पोलीसांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेवुन त्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच गावातील अवैध धंदयाबाबत माहीती गावकऱ्यांनी तात्काळ पोलीसांना दयावी असे अवाहन पोलीसांनी केले. तसेच सदर ग्रामसभेत पोलीसांनी सायबर क्राईम आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी, रस्ते सुरक्षा, महीला व बालके यांची सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करून जनजागृती केली. सदर ग्रामसभेला गावकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.