■ उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्या शुभेच्छा
नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष फोन करून अथवा सोशल मीडियाद्वारे ना. श्री. नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, छत्तीसगढ विधानसभेचे अध्यक्ष रमणसिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेते नाना पाटेकर, सनी देओल व विवेक ओबेरॉय, श्री श्री रविशंकर, सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री, आदींनी सोशल मीडिया अथवा दूरध्वनीद्वारे ना. श्री. गडकरी यांना शुभेच्छा दिल्या.
ना. श्री. गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सकाळपासूनच भेटणाऱ्यांची गर्दी होती. पुष्पगुच्छ, प्रतिमा, चित्र भेट देऊन अनेकांनी ना. श्री. गडकरी यांना शुभेच्छा दिल्या. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने प्रत्यक्ष भेट घेऊन ना. श्री. गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते सकाळी दिव्यांगांना ई-रिक्षाचे वाटपही करण्यात आले. सौ. कांचन गडकरी यांच्यासह कुटुंबातील सर्व महिलांनी ना. श्री. गडकरी यांना औक्षण केले. यावेळी नातवंडांसह नातेवाईकांचीही उपस्थिती होती.
नेत्र व कर्ण तपासणी शिबीरांचे आयोजन
ना. श्री. नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने नागपुरात विविध ठिकाणी नेत्र व कर्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. वैशाली नगर उत्तर नागपूर, प्रबोधन कॉन्वेंट महाल, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान कार्यालय ग्लोकल मॉल आदी ठिकाणी नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला.