- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : प्रभाग 21 महामंत्री पंकज तळेकर यांच्या प्रयत्नाला यश, भजन मंडळांना साहित्य वाटप

नागपूर समाचार : माननीय नितीनजी गडकरी यांच्या निधीतून दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नागपुरातील विविध भागातील भजन मंडळांना साहित्य वाटप केल्या जात असते. आज दिनांक २४ डिसेंबर ला सुध्दा ३५० मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले.

यात आमच्या प्रभागातील 5 मंडळांना साहित्य मिळाले प्रभाग 21 महामंत्री पंकज तळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील 17 मंडळ चे फॉर्म भरण्यात आले होते. उर्वरित मंडळांना दुसऱ्या टप्प्यात साहित्य मिळतील.

यावेळी (अध्यक्ष) तुकाराम जी लांबते, (महामंत्री) पंकज जी तळेकर, (महामंत्री) संजय जी खेडीकर, (महामंत्री) राहुल पराते, (संपर्क प्रमुख ) भूषण येनुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्रभाग 21 भजन मंडळांना साहित्य मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टी, भाजपा कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *