- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : सुनेत्रावहिनी पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवडीचे स्वागत

नागपूरमध्ये अभिनंदन सभेचे आयोजन

नागपुर समाचार : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर (शहर व ग्रामीण) मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात आदरणीय सौ. सुनेत्रावहिनी पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. ही निवड पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नागपूर शहर व ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने त्यांच्या निवडीचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि व्यापक जनसमर्थन लाभेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यासाठी नागपूर पक्ष कार्यालय येथे सभेचे आयोजन करण्यात आले.

शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितले की, “आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अजितदादा यांच्याबद्दल आजही प्रचंड आदर व भावनिक जिव्हाळा आहे. त्यामुळे आजचा कार्यक्रम साध्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने फक्त अभिनंदन प्रस्ताव संमत करण्यापुरता आयोजित करण्यात आला आहे.”

तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “आदरणीय सौ. सुनेत्रावहिनी पवार जेव्हा नागपूर येथे पक्ष कार्यालयाला भेट देतील, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात येईल. संपूर्ण जिल्हा संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्यांचे स्वागत केले जाईल.” 

यावेळी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे,रमेश फुले, नूतन रेवतकर, जानबा मस्के, मुकेश रेवतकर, दिनेश रोडगे, राजू नागुलवार, राजेश समर्थ, राहुल कांबळे, विनोद हरडे, भारती गायद्यने, अशोक काटले, संतोष भुजाडे, निलेश बोरकर, संजय जोशी, सुनील लांजेवार, विश्वास समर्थ, प्रवीण पाटील, रेखा गौर, रवींद्र वाट, जीवन रामटेके, समीर रहाटे, सत्यम सोडगीर,लीना कटारे, रेखा काटोले, कार्तिक लारोकर, दीपेश कोल्लूरवार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.