- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : अक्षरा सिंहने दिला रविवारी भोजपुरी तडका 

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा तिस-या दिवशी नागपूरकर थिरकले

नागपूर समाचार : रुपेरी पडद्यावर आपल्‍या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणा-या आणि सुरेल आवाजाने मंत्रमुग्‍ध करणा-या अक्षरा सिंहने रविवारी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाला भोजपुरी तडका दिला. अक्षराच्‍या गाण्‍यावर नागपूरकर चांगलेच थिरकले. पटांगणावर एकच माहोल झाला.

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्‍या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचा आज तिसरा दिवस होता. भोजपुरी चित्रपटसृष्‍टीतील आकर्षक व्‍यक्तिमत्‍व असलेली अष्‍टपैलू अभिनेत्री व गायिका अक्षरा सिंग यांची रविवारी ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ पार पडली. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलिस आयुक्‍त अम‍ितेश कुमार, निको ग्रुपचे संचालक रमेश जयस्‍वाल, मेट्रोचे सीएमडी श्रावण हर्डीकर, व्‍हीआयएचे अध्‍यक्ष प्रशांत मोहता, एनआयटीचे चेअरमन मनोज सुर्यवंशी, उद्योगपती अशोक गायल, भाजपाचे नागपूर जिल्‍हा अध्‍यक्ष माजी आ. सुधाकर कोहळे, रेल्‍वेचे डीआरएम पांडे, नंदकुमार सारडा यांची उपस्‍थ‍िती होती. दीपप्रज्‍वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

‘मै हवा हुं तेरे दिल में उतर जाऊंगी’ असे म्‍हणत अक्षरा सिंगने मंचावर प्रवेश केला. प्रत्‍येकाच्‍या जीवनात मातेला अढळ स्‍थान राहिले आहे, असे म्‍हणत अक्षरा सिंग यांनी ‘सारी दुनिया का हात, मेरे सरसे हटे, मां तू अपना हटाना ना’ हे भोजपुरी गीत सर्व मातांना समर्पित केले. त्‍यानंतर अक्षराने ‘नागपूर गरदा उडावत चाली’ हे गाणे व नृत्‍यावर गरदा उडवला. नायिका म्‍हणून करीअरला सुरुवात केली पण गाणे म्‍हणत येत नव्‍हते. रसिकांच्‍या प्रेमापोटी गायला सुरुवात केली असे म्‍हणत अक्षराने ‘मेरे रश्‍के कमर तुने पहली नजर’ या गीतावर ठुमके लगावले. ‘हाल क्‍या है, दिलों का ना पुछो सनम’, ‘इश्‍क और प्‍यार का मजा लिजिए’ सारखी अनेक जोशपूर्ण गाणाी सादर करीत रसिकांचा थिरकायला भाग पाडले. मुंबईचा युवा गायक कुणाल पंडितने अक्षराला उत्‍तम साथ दिली. सोबतच, मेरी रुह का परिंदा, धीम धीम ताना, हम्‍मा हम्‍मा आदी गीते सादर केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व बाळ कुलकर्णी यांनी केले. महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *