- Breaking News, नागपुर समाचार

राष्ट्रीय समाचार : दिव्यांगांचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन धामधुमीत पार पडले

राष्ट्रीय समाचार : प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ हिजीअली चॅलेंज इंडीया यांच्या वतीने मथुरा येथे चौथे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक २४ ते २६ सप्टेंबर २023 ला पार पडल. या अधिवेशनात जवळपास 400 दृष्टीबाधील सदस्यांनी भाग घेतला.

दिनांक 24 सप्टेंबरला सकाळी १० वाजता रितसर उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी मथुरेतील सुप्रसिद्ध समाजसेवक राज्यमंत्री रविंद्र गर्ग आणि अनील अग्रवाल, जिंदल साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष गुप्ता साहेब, राष्ट्रीय महासचिव बालचंद्र उपाध्याय साहेब अनेक मान्यवर होते. 

संघटनेची वाटचाल ध्येयधोरण न्यावर महासचिव उपाध्याय यांनी प्रकाश टाकला, या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केलेल्या दिव्यांगांचा सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी संघटनेचे कौतुक करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच राष्ट्रीय कार्यकारीणी सौ. सुनंदा पुरी, राष्ट्रपती पुरस्कृत नेहा पावस्कर, वाईस प्रेसीडेंट केतकी शाह, अध्यक्ष त्र्यंबक मोकासरे सर, उपाध्यक्ष मिनाक्षी बारहाते आणि अशोक पवार, बादल कापसे अशे अनेक मान्यवर उपस्थित होते.

दुपारी १ वाजता दिव्यांगांचे राजकीय सहभाग या भागात भारतीय राजकारणात दिव्यांगांचा सहभाग होती. असावा व कसा असावा यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले दिव्यांगांनी दिव्यांगांच्या क्षेत्राच्या पलीकडे सुद्धा सहभाग घ्यावा व राजकारणात सहभागी व्हावे. आणि वैयक्तीक लेवल वर काम करावे असे मार्गदर्शन केले.

यात वृक्षारोपन, जलसंवर्धन, शैक्षणिक दृष्ट्या गोरगरीबांना आर्थिक मदत करने, देशभक्ती, राष्ट्रभक्ती अशा उपक्रमात भाग घेऊन आपली प्रतिमा समाजासमोर आणावी, तेव्हाच समाज आपल्याला राजकीय राजकारणान समाऊन घेईल.

दुपारी २ ते ३ भोजन समारंभ झाले. ३ वाजता अधिवेशन घेण्यात आले. हे अध्यक्ष त्र्यंबक मोकासरे यांच्या अध्यक्षते खाली पार पडले. भारतातून आलेले दृष्टीबाधीतांनी भाग घेतला. सुनंदा पुरी, नेहा पावस्कर, राजेंद्र गंगाधर अश्या अनेक मान्यवरांनी ज्वलंत प्रश्न मांडले. त्यात दिव्यांग क्रिडा पटूंना स्पेशल संकुलन उभारून शासनाने यांची जबाबदारी घ्यावी, क्रीडापटूंना भाग घेतांना सरकारानं खर्च घ्यावा, दिव्यांगांना गांधी निराधार निधीत वाढ करावी, तसेच सर्व शिक्षा अभियान मधील शिक्षकांना कायम स्वरूपी नौकरीत समावून घ्याव. दिव्यांगांना रेल्वे सवलतीचे प्रमानपत्र स्थानिक रेलवे स्टेशनला देण्यात यावे. विधानसभा व राज्यसभेत दिव्यांगांच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात यावी. 

26 सप्टेंबरला मथुरा व वृंदावन दर्शन साठी संघटनेतर्फे २१ गाड्यांतून सर्व सदस्यांना अनेक प्रसिद्ध देवस्थानचे दर्शन घेण्यात आले व मथुरा भ्रमणचा सर्व दिव्यांगांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *