- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : मिशन लाईव्हहुडमुळे रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर समाचार : मिशन लाईव्हहुडसाठी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त व सर्वसाधारण गावांची तालुकानिहाय्य निवड करा. कृषी विभाग, आत्मा, माविम यांच्या समन्वयातून काम करुन मिशन लाईव्हहुडच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराचे जाळे निर्माण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.

मिशन लाईव्हहुड अर्थात मिशन उपजिविकाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पशुसंवर्धन उपायुक्त नितीन फुके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना कडू, मदर डेअरी व माविमतसेच संबंधीत अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

कृषी विभागाचे सहकार्याने पशुसंवर्धन विभागाने विविध योजना राबविल्यास पशुपालकासह शेतकऱ्यांनी त्याचा लाभ होईल. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सोबतच माविमच्या बचत गटातर्फे आत्माच्या प्रकल्प राबविल्यास त्यांना रोजगार मिळेल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मदर डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी योग्य भाव मिळाल्यास त्याचा मदर डेअरीला होईल. विविध उत्पादनात वाढ होईल. यासाठी पशुमित्र, सखी या ग्रामीण भागातील सेवकांची मदत घ्या. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 गावात पशुसंवर्धन विभागाने पक्षी वाटप कार्यक्रम केल्यास त्यांच्याही उत्पनात वाढ होण्यास मदत होईल. वैरण विकास योजना त्यांनी राबवावी. त्यामुळे जनावरास चांगली अन्न मिळून त्यांच्या दुध देण्याच्या क्षमतेस वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मदर डेअरी, पशुसंवर्धन, आत्मा, कृषी,माविम, मत्स्यव्यवसाय, हातमाग आदी विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. आत्माचे प्रशिक्षण ‍शिबीर व साठवण केंद्र प्रत्येक तालुक्यात स्थापन करा. मोटार रिवाईंडींग व रिपेरिंग या आरसेडीच्या निशुल्क प्रशिक्षण लाभार्थ्यांना दया. मोबाईल ज्यूस सेंटर तालुक्याच्या महिला बचत गटांना दया. पशुसंर्वधन विभागाने तालुकानिहाय अंडी उबवन केंद्र स्थापन करावे. मत्स्यव्यवसातून मत्स्य उत्पादनात वाढ करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *