- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ऑडिओ बुक्‍समुळे ‘स्‍क्रीन टाईम’ कमी होतो – सोनाली नक्षिणे

नागपूर समाचार : सध्‍याच्‍या काळात मोबाईल, कम्‍प्‍युटर, टीव्हीच्‍या अतिरेकी वापरामुळे मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ वाढला असून त्‍याचे मुलांवर होणारे दुष्‍परिणाम दिसू लागले आहेत. ऑडिओ बुक्‍स, पॉडकास्‍ट सारख्‍या आवाजी माध्‍यमांमुळे ‘स्‍क्रीन टाईम’ कमी होण्‍यास मदत होईल आणि मुलांच्‍या श्रवणशक्‍तीमध्‍ये वाढ होईल, असे प्रतिपादन आरजे व व्‍हाईल व्हिला प्रा. लि. च्‍या संचालिका सोनाली नक्षिसे यांनी केले. 

सी. पी अँड बेरार कॉलेजतर्फे ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ मालिकेअंतर्गत शनिवारी ‘आवाजी माध्‍यमातील संधी व व्‍याप्‍ती’ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले होते. कॉलेजच्या न्यू सेमिनार हॉलमध्‍ये झालेल्‍या या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाविद्यालयाच्‍या वाणिज्‍य विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्‍ल सुदामे यांची उपस्‍थ‍िती होती. 

सोनाली नक्षिणे यांनी आवाज उद्योगाची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणावर आहे आणि या उद्योगामध्ये कोणकोणत्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे, स्वयंरोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत तसेच एक मोठी इंडस्ट्री कशा पद्धतीने तुम्ही सुरू करू शकता, यावर सविस्तर माहिती दिली. 

आयोजन सचिव डॉ. मेधा कानेटकर यांनी प्रास्‍ताविकातून आवाजी माध्‍यमांचा विपणन क्षेत्रातील महत्‍त्‍व विशद केले. आपली उत्‍पादने, कला लोकांपर्यंत परिणामकारकरित्‍या पोहोचवण्‍यासाठी आवाजाचा उपयोग करून जाहिरात करण्‍याचा ट्रेंड वाढत चालला आहे. नोकरीकरून शिक्षण पूर्ण करणा-यांसाठी ऑडिओ बुक लाभदायी ठरतात, अशी माहिती दिली. आवाज उद्योगात विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजोल यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्‍यांची मोठ्या प्रमाणात उपस्‍थ‍िती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *