- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नागपुरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा ‘मीट द प्रेस’ कार्यक्रम; विकासकामांवर खुली चर्चा

नागपूर समाचार : पत्रकार क्लब ऑफ नागपुर येथे आयोजित “मीट द प्रेस” कार्यक्रमात कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांपासून ते नागरिकांच्या दैनंदिन सुविधांपर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी माहिती दिली.

यावेळी महसूल विभागाचे कामकाज, पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेली तयारी, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यातील प्रमुख प्रश्न आणि त्यावरील उपाययोजनांवरही त्यांनी भाष्य केले.

कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर आणि सकारात्मक उत्तरे दिली. प्रशासन नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य देत असून, सर्वसामान्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमामुळे प्रशासन आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये अधिक प्रभावी संवाद साधला गेला.