- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपूर समाचार : जलप्रदाय विशेष समिती श्रीमती दिव्या धुरडे यांनी घेतला आढावा

नागपूर समाचार : मा. सभापती जलप्रदाय विशेष समिती श्रीमती दिव्या धुरडे यांचे अध्यक्षतेखाली आज दि. 08/05/2026 रोजी जलप्रदाय विभागाशी संबंधीत विषयांवर गांधीबाग झोन क्र. 6 व धंतोली झोन क्र. 4 येथे सभा आयोजित करण्यात आली होती. सभेस संबंधीत झोन क्र. 6 चे सभापती मा. श्रीमती उमा देशमुख व धंतोली झोन क्र. 4 चे सभापती श्रीमती भारती विकास बुंदे संबंधीत झोनचे मा. नगरसेवक/नगरसेविका जलप्रदाय समितीचे मा. सदस्य तथा नगरसेवक, अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी सा.आ.अभि.वि., कार्यकारी अभियंता, श्री. श्रीकांत वाईकर (जलप्रदाय), उपअभियंता श्री. नरेंद्र तोटेवार, सहा. आयुक्त झोन क्र. 4 श्री. प्रमोद वानखेडे, डेलीगेट झोन क्र. 6 श्री. अजय घरजाळे, डेलीगेट झोन क्र. 4 श्री. नितीन झाडे आणि ओ.सी.डब्ल्यु पी.एल. चे कर्मचारी उपस्थितीत होते.

सभे दरम्यान मा. नगरसेवकांनी त्यांचे प्रभागातील जलपुरवठा संबंधीत नागरीकांच्या तक्रारी/विषयावर चर्चा करण्यात आली. चर्च दरम्यान मा. नगरसेवकांनी त्यांचे प्रभागात कमी दाबाने व कमी प्रमाणात जलपुरवठा होत असल्याचे निर्देशनास आणुन दिले याबाबत मा. सभापती यांनी सुधारणा करण्याचे व कमीत कमी 2 तास सर्व प्रभागात पाणी नियमित पुरविण्याचे निर्देश मे. ओ.सी. डब्ल्यू पी.एल. कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच नविन जलवाहिनी टाकल्यानंतर खोदकाम केलेल्या जागेचे पुर्नरभरण (Restoration) ते योग्य प्रकारे होत नसल्याचे ते योग्य प्रकारे त्वरीत पूर्ववत करण्याचे निर्देश मा. सभापती यांनी ओ.सी. डब्ल्यू पी.एल. ला निर्देश दिले.

प्रभागातील सर्व विहिरींची योग्य प्रकारे स्वच्छता करण्याचे सुध्दा निर्देश देण्यात आले. पाच वर्ष जुने पाण्याचे मिटर निशुल्क लाऊन मिळेल याबाबत चे सुचना फलक प्रत्येक झोनच्या कार्यालयात दर्शनी भागात लावण्याचे निर्देश मे. ओ.सी. डब्ल्यू पी.एल. ला देण्यात आले. तसेच तसेच पाणी मिटर रिडींग चे काम सकाळी 10 वाजेपर्यत व सायंकाळी 5.00 वाजता नंतर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. महाल उपाध्ये गल्ली येथील खोदकाम केलेल्या जागेचे पुर्नरभरण (Restoration) चे काम गुणवत्तापूर्ण व योग्य पध्दतीने त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच हनुमाननगर, प्रगती कॉलनी म्हाडा क्वार्टर व चंदननगर येथील पाणी पुरवठा योग्य दाबाने व मुबलक प्रमाणात करण्याचे निर्देश दिले.