नागपुर समाचार : भारतदुर्गा मंदिराचा आजचा शिलान्यास सोहळा हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. नव भारत निर्माणाची प्रेरणा यातून आपल्याला मिळेल. नागपूर देशाच्या मध्यस्थानी आहे. त्यामुळे अनेकांसाठी हे ठिकाण येण्यासाठी सोईचे व प्रेरणादायी ठरेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, या मंदिराच्या निर्माणातून सर्वांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. यातून मिळणारी वैचारिक प्रेरणा ही अधिक महत्त्वाची ठरेल, असे ते यावेळी म्हणाले.




