नागपुर समाचार : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी आगमन झाले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर नीता ठाकरे, एअर मार्शल यल्ला उमेश, मेजर जनरल नवतेज सिंह सोहल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.







