- Breaking News, नागपुर समाचार, प्रतिक्रिया

नागपूर समाचार : धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी

नागपूर समाचार : धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज (उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख) यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची अपूरणीय हानी झाली आहे. आपल्या ओजस्वी वाणीने आणि शिवकथांच्या माध्यमातून त्यांनी समाजात धर्म, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवली.

सद्गुरूदास महाराज हे केवळ प्रवचनकार नव्हते, तर ते समाजाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे अनेक उपक्रम राबवले आणि गुरुमंदिर परिवाराला एक सशक्त आधार दिला. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहतील.

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या अनुयायांना व परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच विनम्र श्रद्धांजली!

– आ. संदीप जोशी