- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : फक्त संघर्ष घर नही तो वोट नही महा नगर पालिका निवडणुक उमेदवारांचा निषेध…

नागपूर समाचार : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचा मतदार संघ दक्षिण पश्चिम विधानसभा ५२ नागपूर परिसरातील पडाव फेल चिंच भवन वर्धा रोड नागपूर येथे गावातील रहिवाशी यांनी नागपूर महानगर पालिका निवडणूकांचा बहिष्कार म्हणजे नो वोटिंग चक्क प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला घरावर बॅनर लावून आव्हान केले.

नगरसेवक साठी उभे झालेले उमेदवार तुम्ही नको या कारण की पडाव फेल वस्ती चिंच भवन येथे मागील 15 वर्ष अगोदर महामार्ग साठी रहिवाशी यांचे घर तोडण्यात आले ते घर आज पर्यंत पुनर्वसन दिलेली नाही त्या जागेवर टीना चे पत्रे लावून जगत आहे प्रवासी नागरिक त्यांच्याकडे मागील पंधरा वर्षापासून घर नाही इलेक्ट्रिक नाही पिण्यासाठी पाणी नाही असे अनेक समस्या ला घेऊन जगत आहे एकूण 18 परिवार त्यासाठी त्यांनी नागपूर महानगर पालिका निवडणुकीच्या बहिष्कार केलेला आहे.