- Breaking News, विदर्भ

परभणी समाचार : परभणीच्या विकासाकरिता भाजपा तत्पर 

परभणी समाचार : परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ ‘विजय संकल्प सभेत’ उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. 

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत योजनेमधून परभणी शहरात पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आणि भुयारी गटार योजनेसाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला, त्यामुळे परभणीकरांना पिण्याचे स्वच्छ पाणी तर मिळेलच, तसेच भुयारी गटार योजनेमुळे शहर दुर्गंधीमुक्त होणार आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ‘पीएम ई-बससेवेचा’ ₹14 कोटींचा प्रकल्प केला असून, 40 बस परभणीला मिळणार आहेत. यामार्फत परभणी प्रदूषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल करेल. 

राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे विशेष कौतुक, कारण त्यांनी CIIIT परभणीत आल्यानंतर टाटा ट्रस्टसोबत मोठा करार करून इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटर या शहरात आणले. आता 3000 परभणीकर इथूनच ट्रेनिंग घेऊन निघतील आणि रोजगार निर्माण करतील हा विश्वास आहे.   

प्रधानमंत्री आवास योजेनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे पक्के घर मिळवून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे, त्यामुळे पुढच्या 5 वर्षांमध्ये परभणीत राहणारे झोपडपट्टीवासी व गरिबांना जमिनीचा मालकी हक्क आणि पक्के घर मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे. 

येत्या 15 तारखेला परभणीवासियांनी कमळाची काळजी घ्यावी, पुढील 5 वर्ष परभणी शहराची काळजी घेण्याची जबाबदारी आम्ही घेऊ.

यावेळी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.