स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी साठी जबाबदारी स्वीकारताना व्यक्त केला विश्वास…
गडचिरोली समाचार : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी नुकतेच जाहीर केली असून, या यादीत माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
या निवडीमुळे पक्षातील आदिवासी नेतृत्वाला नवे बळ मिळाले असून, गडचिरोली–चंद्रपूर जिल्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मा.खा.डॉ. नेते यांनी या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. ना. श्री. रविंद्रजी चव्हाण यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी गौरवाची आणि प्रेरणादायी जबाबदारी आहे. ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणार असून, पक्षाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या प्रयत्नांचा निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल.”
डॉ. अशोकजी नेते हे संघटनशक्ती, विकासदृष्टी आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्कासाठी ओळखले जातात. आदिवासी समाजातील प्रबोधन, शिक्षण आणि राजकीय सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य लक्षणीय आहे.
त्यांच्या या स्टार प्रचारकपदी नियुक्तीमुळे भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना नवी उभारी मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.




