- Breaking News, उद्घाटन, विदर्भ

हिंगणघाट समाचार : पीएमश्री उच्च प्राथमिक शाळा नांदगाव येथे डिजिटल शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण आ. समिर कुणावार यांचे शुभ हस्ते

हिंगणघाट समाचार : जिल्हा परिषद, वर्धा अंतर्गत पी. एम. श्री. उच्च प्राथमिक शाळा, नांदगाव (बो.) येथे डिजिटल साहित्य लोकार्पण सोहळा आज दि.११ रोजी पार पडला. उपरोक्त कार्यक्रम शैक्षणिक क्षेत्रातील डिजिटल परिवर्तन तसेच आधुनिक शिक्षण पद्धतीकडे वाटचाल याचा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला. आधुनिक काळातील शिक्षण प्रक्रियेत डिजिटल साधनांचा वापर हा केवळ एक पर्याय नसून गरज बनला आहे. 

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सखोल आणि सुलभ पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे. पि.एम. श्री. योजना (PM SHRI – Pradhan Mantri Schools for Rising India) अंतर्गत ही शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक कॅम्पस तसेच डिजिटल लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.

सदर साहित्य शाळेत उपलब्ध झाल्याने स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, ई-लायब्ररी, Astonomy Lab (खगोलशास्त्र प्रयोगशाळा), Computer Lab (संगणक कक्ष), Robotics Lab आणि डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून यापुढे शिक्षण दिले जाणार असल्याने ही शाळा डिजिटली अद्यावत अशी ठरेल.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसाकडे, गटशिक्षण अधिकारी अरविंद राठोड, ग्रामपंचायत नांदगावचे प्रशासक दीपक चौधरी, शाळा समिती अध्यक्ष पूनम क्षीरसागर, शाळा समिती उपाध्यक्ष सोनू मडावी, मुख्याध्यापिका श्रीमती सीमा बेले, ज्येष्ठ नागरिक रामदासजी गेडेकार, माजी पंचायत समिती सदस्य वैशाली पुरके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र राठी, तेजस तडस, संजय तडस, प्रवीण कुडे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल कारमोरे, ग्रामसेवक श्री. कांबळे, अशोकराव देवाडे, केंद्रप्रमुख सुपपाम, विस्तार अधिकारी उमेश शिंगोटे, राजू बोभाटे, श्री. कुकडे , प्रकाशजी रोकडे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.