- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : केबल इंटरनेट च्या संचालकावरील कायदेशीर कारवाई करण्याचे मनपा आयुक्तांना निवेदन

शिवसेना प्रणित महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना नागपूर शहरांच्या वतीने मनपाचे आयुक्त अभिजीत चौधरीना दिले निवेदन

नागपूर समाचार : शहरातील सर्वच इंटरनेट संचालक, टीव्ही केबल संचालक या सर्वांनी शहरातील केबलद्वारे वायरचे झाळे पसरविले आहेत आणि यामुळे सामान्य लोकांचे जीवाला धोका निर्माण केल्यामुळे त्यांच्या विषयी अनेकांच्या तक्रारी आयुक्तांकडे दाखल झाल्या परंतु हा मुद्दा समाजसेवक व शिव माथाडी कामगार शहर अध्यक्ष सिद्धु कोमजवार यांनी शहरातील वायरचे जाळे याचा मुद्दा धरून आयुक्तांना निवेदन दिले व त्यांच्यावरील कठोर कारवाई व्हावी व जनतेला दिलासा मिळावा.

रस्त्यावरील आलेले वायर हे जीवाला धोका असून त्यांचे वायर जप्त करावे व दंडू वसूल करण्यात यावे. तसेच विजेच्या खांबावर, झाडांवर, इमारतींवर, उड्डाण पूलांवर, रेल्वे फुलांवर, फुटपाथ वरील केबल चे जाळे पसरविलेले आहेत.

त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि इलेक्ट्रिकच्या खांबावर केबलची वायर चढवून मनमानी करून व एम एस ई बी ला, परवानगी न घेता -टीव्ही केबल संचालक, इंटरनेट संचालक, यांच्यावरील कठोर कारवाई करावी व तुटलेले वायर रस्त्याच्या मधोमध पडून वाहन चालकांच्या गळ्याला फास लागून वाहन चालकाचे अपघात होऊ शकतात याची जबाबदारी कोण घेणार ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

इंटरनेट केबल, टीव्ही केबल टीव्ही, कंपन्या व सर्व संचालकांनी नागरिकांचा जीव धोक्यात आणलेला आहे. त्या सर्वच संचालका विरोधात सदोष मानव हत्या, नागरिकांचा जिव धोक्यात टाकून वाहतूक रहदारीला अटकाव, शहराचे विद्रुपीकरण, या सर्वांवरील गुन्हे दाखल करून त्यांच्यावरील कठोर कारवाईची मागणी या निवेदनात केली आहे.

परंतु प्रभावाने रस्त्यापासून दहा फूट पेक्षा कमी अंतर असलेले सर्व केबल वायर कापून जप्त करावे व त्यांच्याकडून दंड वसूल करावा. ही सुद्धा मागणी केलेली आहे. निवेदन देतेवेळी सिद्धु कोमजवार, वामन साळवे, विलास ईटनकर, चांगदेव शेदरे, भानुदास खेडकर, विजय कडु, इत्यादी जेष्ठ नागरिक उपस्थित होते.