कन्हान समाचार : जवळील निलज गावात महावितरण व्दारे नविन स्माट मिटर लावल्याने ग्रामस्थाना तीन, चार पट बिल येत असल्याने वीज बिल भरायचं की पोट भरायचं ? असा संताप ग्रामस्थानी व्यकत करित ग्राम पंचायत मध्ये सहायक अभियंता वाघमारे यांना बोलावुन गावात लावलेले स्माट मिटर काढुन जुनच मिटर लावा. तसेच वाढीव बिलाचा योग्य तोडगा काढा. अशी मागणी करण्यात आली.
ग्राम पंचायत निलज (खंडाळा) येथे कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता महावितरणने नवीन स्मार्ट मीटर गावात लावले. ज्यांनी विरोध केला त्यांना २५ हजार रुपये दंड आकारण्यात येईल अशी धमकी विज ग्राहकांना देण्यात आली होती. महावितरणचा अरेरावी आणि धमकीच्या भीतीमुळे ग्रामस्थानी मीटर लावुन घेतले परंतु आता ज्यांना अगोदर हजार रूपयाच्या जवळपास वीज बिल यायचे त्यांना आता चार हजार ते पाच हजार रूपये पर्यंत बिल येत असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकानी वीज बिल भरायचं की पोट भरायचं ? असा प्रश्न ग्रामस्था पुढे निर्माण झाल्याने ग्राम पंचायत मध्ये नागरिक एकत्र येऊन तक्रार केल्याने ग्रा प व्दारे महावितरण ग्रामिण सहायक अभियंता वाघमारे व लॉईनमँन यांना बोलावुन विधृत ग्राहकाकडे लावलेले नविन मिटर विषयी संताप व्यक्त करून हे नविन मिटर काढुन त्यांचे जुने मिटर लावण्यात यावे आणि सात दिवसाचा आत वाढीव बिला विषयी योग्य तोडगा काढावा अशी मागणीचे पत्र आणि ग्रा प ठराव प्रत देण्यात आली आहे.
यावेळी सरपंच सुनील डोंगरे, उपसरपंच गुंडेराव भुते, ग्राम पंचायत सदस्य रामचंद्र चकोले, धनराज चकोले, महेंद्र चकोले, आयुष पाहुणे, आशिष चकोले, रामकृष्ण पाहुणे, मुकेश भुते, कमला कर टोहाणे, गोपीचंद बावणे, राकेश भुते, राकेश चकोले, लोकेश चकोले, केशवराव चकोले, नानेश्वर चकोले, दिवाळु चकोले, विशाल चकोले, केवल पाहुणे, महादेव तळेकर, खेमराज चकोले, बाळकृष्ण देशमुख, शेषराव चकोले, समीर चकोले, देवाजी चकोले, उमेश मेश्राम सह बहु संख्येने गावकरी उपस्थित होते.
ग्रामिण ग्रामस्थाच्या समस्या विषयी हे सरकार मुरदाळ – रविंद्र चकोले
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नवीन स्मार्ट मीटर लावले जाणार नाही असे स्पष्ट केले असताना महावितरण अधिका ऱ्यांना विचारलं असता ते म्हणतात हा शासनाचाच आदेश असुन आम्ही त्याची अंबलबजावणी करत आहो. त्यामुळे सरकारचे दुटप्पी धोरण सर्व सामान्य माणसांना त्रास देणारे आहे. हे सरकार ग्रामिण ग्रामस्थ सामान्यांचं नाही असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते रविंद्र चकोले यांनी व्यक्त केले असुन वेळ पडल्यास महावितरणाच्या भोंगळ कारभाराविषयीं जनजागृती करून आंदोलन करू असे त्यानी स्पष्ट केले.
स्मार्ट मिटर लावणे किंवा न लावणे हा आमचा संविधानिक अधिकार – अँड अभिलाष चकोले
जुन्या मीटर मधे कुठलाही दोष नसताना व तसेच स्मार्ट मीटर न लावल्यास २५ हजाराचा दंड आकारन्यात येईल असे सांगुन उपभोक्त्यांना सांगुन ग्राहकांची फसवणुक करून स्मार्ट मीटर जोर जबरद स्तीने लावण्यात आले आहे. गरज पडल्यास न्यायाल यीन लढाई लढु असे स्पष्ट मत अँड अभिलाष चकोले यांनी व्यक्त केले.




