- Breaking News, नागपुर समाचार

रामटेक समाचार : रामटेक लोक अदालतीत ३०१ प्रकरण निकाली

निकाली प्रकरणातून ३० लक्ष २४ हजार ७० रुपये वसुल

रामटेक समाचार : जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या लोकअदालतीत ३०१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या माध्यमातून ३० लाख २४ हजार ७० रुपयांची नुकसान भरपाई व वसुली करण्यात आली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष एस. एम. सरोदे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर रामटेक यांनी दिली. जिल्हा विधी सेवा समिती नागपूर यांच्या आदेशाने जिल्ह्यात १३ सप्टेंबर रोजी नागपूर जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.

राष्ट्रीय महा लोकअदालतीमध्ये नेमलेल्या पॅनेल समोर दिवाणी व फौजदारी, (१३८) एन.आय अँक्ट, बैंक पतंसस्थाचे दाखल पुर्व प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीचे घर व पाणी, वीज बील करांची प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी १५ दिवाणी व १७५ फौजदारी प्रकरणे, बँकेतील ०९ दाखल पूर्व प्रकरणे तसेच १०६ घर टॅक्स बील प्रकरण असे एकूण ३०१ प्रकरणांतुन एकुण ३० लक्ष २४ हजार ७० रूपये च्या प्रकरणातुन तडजोड करून निपटारा करण्यात आला. विशेष म्हणजे या महा-लोकअदालती दरम्यान हिन्दु विवाह कायदा अंतर्गत प्रकरण क्र. १३४/२०२४ मोक्षीनी राउत वि. उमेश राउत या दोन्ही पक्षकारामध्ये आपसी तडजोड होउन मोक्षीनी राउत ही नांदावयास गेली.

सदर लोकअदालीत रामटेक तालुका विधी सेवा समितीचे अँड. एस. एम. सरोदे दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर रामटेक तसेच डी. सी. वोराणी २ रे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, रामटेक उपस्थीत होते. पॅनेल वर पॅनल मेंबर म्हणून अँड. एम. एम. पेंदाम व अँड. पी. के. महाजन यांनी कामकाज बघीतले. तसेच लोकअदालत यशस्वी करण्याकरीता तालुका बार असोसिएशन रामटेक आणि सर्व न्यायालीन कर्मचारी, शिपाई, स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *