- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार : मोकाट श्वानांच्या नियंत्रणासाठी मनपातर्फे विशेष मोहिम

मिशन रेबीज अंतर्गत दोन आठवड्यात 5 हजारांवर श्वानांचे लसीकरण

नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिका द्वारा मोकाट कुत्र्यांची नसबंदी व रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन रेबीज’ या उपक्रमांतर्गत दोन आठवड्यात 5 हजार 133 श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शन अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या देखरेखीत शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी ‘मिशन रेबीज’उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या २८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांद्वारे शहरातोल मोकाट श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत मिळणार आहे.

वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस होप, मिशन रेबिज, निर्मिती पिपल्स अॅन्ड अॅनिमल वेलफेअर सोसायटी, नागपूरद्वारा सामूहिक श्वान रेबिज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेकरिता वर्ल्ड वाईड व्हेटर्नरी सर्व्हिस (डब्ल्यू व्हीएस) तर्फे लसीसह डॉक्टर आणि सहायक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महानगरपालिकेतर्फे वाहन आणि श्वानांच्या लसीकरणासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शहरातील मोकाट प्राण्यांना हाताळणे व त्यांच्यावर नियंत्रणाच्या दृष्टीने नागपूर शहरामध्ये याकरीता भांडेवाडी, गोरेवाडा, आणि महाराजबाग प्राणी जन्म नियंत्रण केंद्र तयार करण्यात आले. येथे मोकाट कुत्र्यांना औषधोउपचारानंतर पश्चात सोडण्यात येत. आतापर्यंत या तिन्ही केंद्रात तीन वर्षात 56 हजार 997 कु्त्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

मनपाद्वारे भांडेवाडी परिसरात आधुनिक श्वान निवारा केंद्र व प्राणी निर्बीजीकरण केंद्र सुद्धा उभारण्यात आले आहे. याशिवाय आजारी, अपघातग्रस्त, पिसाळलेली, चावा घेणारी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन निहाय वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे लसीकरण मोहिमेला अधिक गती मिळाली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भग, व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

श्वान प्राणी प्रेमींना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

प्राणी प्रेमींनी या अँटी रेबीज लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी मनपाद्वारे आवाहन करण्यात आले आहे. प्राणीप्रेमींना त्यांची माहिती

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScCoeyLhuHmfrCIYA5cHQH9GmYK5lR7q5C6B1tgB0HVupEHZQ/viewform?pli=1

या गुगल फॉर्म भरून द्यावयाची आहे. त्यात आपले आपले नाव, पूर्ण पत्ता, झोनचे नाव, फोन नंबर, ईमेल आयडी, श्वानांना अन्न देण्याचे ठिकाण, त्या ठिकाणी असलेल्या श्वानांची संख्या, रेबीज लसीकरणाची स्थिती, आदी माहिती द्यावी भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचे डॉक्टर पोहचून कुत्र्याचे लसीकरण करणार आहेत.

14 सप्टेंबर पर्यंत लसीकरणाची माहिती, अ.क्र दिनांक लसीकरण

1. 1 सप्टेंबर 2025 – 20

2. 2 सप्टेंबर 2025 – 75

3. 3 सप्टेंबर 2025 – 25

4 . 4 सप्टेंबर 2025 – 37

5. 5 सप्टेंबर 2025 – 56

6. 6 सप्टेंबर 2025 – 58

7. 8 सप्टेंबर 2025 – 55

8. 9 सप्टेंबर 2025 – 67

9. 10 सप्टेंबर 2025 – 566

10. 11 सप्टेंबर 2025 – 1074

11. 12 सप्टेंबर 2025 – 1147

12. 13 सप्टेंबर 2025 – 1117

13. 14 सप्टेंबर 2025 – 836

——————————————————

एकूण लसीकरण = 5133

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *