संपूर्ण भारतातील कॉम्पिटिशन फेस्टिवल – 2025
नागपूर समाचार : श्रीकृष्ण कल्चरल फाउंडेशन नागपूर च्यावतीने गुरुनानक भवन सभागृहासमोर अंबाझरी फुटाळा चौक नागपूर येथे श्रीकृष्ण नृत्यलयम मध्य भारतातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ११ ते १४ सप्टेंबर दरम्यान चार दिवसीय महोत्सवात भारतातील प्रतिभावान कलाकारांचा सहभाग असलेल्या शास्त्रीय नृत्य संगीताचा विविध सादरीकरणाचा समावेश आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे आठवे वर्ष असून या महोत्सवात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड, या राज्यातून सहभागी होतील.
कार्यक्रम सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत स्पर्धा चालणार असून पुढीलही कार्यक्रमाची रूपरेषा सचिव व संस्थापिका प्रमिला उन्नीकृष्णन यांनी या कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे कलाकारांना त्यांचे कौशल्य व समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे होय असे सुद्धा प्रमिला उन्नीकृष्णन यांनी पत्रकारांना सांगितले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गणेश थोरात यांच्या शुभहस्ते महोत्सवाची सुरुवात होईल. कला व संस्कृतचा भव्य उत्सवाच्या आयोजनासाठी श्रीमती प्रमिला उन्नीकृष्णन डॉ. हनी उन्नीकृष्णन, हरी उन्नीकृष्णन, सागर चोपडे, पियुष बोपाटे, भावेश चौधरी, संकेत रायकवार हे अथक परिश्रम घेत आहे.