- Breaking News, आयोजन, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भंते विनाचार्य यांच्या जनसंवाद कार्यक्रम दिनांक 16 ऑगस्ट रोजी नागपूर येथे

विशेष अतिथी: -हिमांशू सोनी, सिने अभिनेता प्रथमच नागपूर शहरात

दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता पवित्र दीक्षाभूमि नागपुर ईथून धम्म ध्वज यात्राचे शुभारंभ.

पूज्य भिक्षुसंघाचा प्रमुख उपस्थितित.

नागपुर समाचार : नागपूर दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी बुद्धिस्ट समन्वय संघ, महाराष्ट्र आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे दुपारी 12 वाजता महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन तथा बीटी अॅक्ट 1949 रद्द करणे या प्रमुख मागणीसाठी भंते विनाचार्य यांची जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 

या कार्यक्रमांमध्ये पूज्य भंते रेवत संघनायक, इंडिया, पूज्य भंते उपगुप्त कार्याध्यक्ष,भारतीय भिक्षसंघ महाराष्ट्र राज्य,कार्यकारी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा मा. भीमराव आंबेडकर, पूज्य भदंत ज्ञानज्योती, भंते हर्षबोधी, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये असणार आहे. 

या कार्यक्रमांमध्ये विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेता हिमांश सोनी, (ज्यांनी झी टिव्ही चैनल वर भगवान बुद्धांची भूमिका साकारली आहे. आमंत्रित करण्यात आले आहे. भंते विनाचार्य यांना मागील अनेक दिवसापासून बिहार सरकारने जेलबंद केलेले होते, हे जवळपास 63 दिवस तुरुंगात होते. बिहार तुरुंगातून सुटका झाल्याच्या नंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या या उपराजधानी नागपुर मध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लढा पुन्हा नव्याने उभा करण्यासाठी येत आहेत. ही जनसंवाद यात्रा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. ही यात्रा जवळपास 38 दिवसाची असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भव्य प्रमाणावर मोठी जनसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते,कार्यरत आहेत. 

या यात्रेचे समापन येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर करण्यात येणार आहे. सदर माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक श्री नितीन गजभिये यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळविलेले आहे. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश धारगावे, विलास मेश्राम, योगेश राऊत,राजू शेंडे, मुकेश मेश्राम, शितल मूल, सतीश गजभिये, बबलू निकनवरे, रिंकेश मोडघरे, संघपाल उपरे, मुकेश मेश्राम, आधी असंख्य कार्यकर्ते कार्यरत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *