गडचिरोली समाचार : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथक जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली रेड रिबन स्थापित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता करीता ३० जुलै २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता जिल्हा क्रिडा संकुल या ठिकाणी जिल्हास्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
उद्घाटना प्रसंगी अध्यक्ष स्थानी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलींद नरोटे यांनी हिरवी झेंडी दाखवुन मॅरेथॉन स्पर्धा सुरु करण्यात आली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी युवकांना एचआयव्ही / एड्स बाबत जागृत माहिती देऊन सर्तक राहण्याबदल आव्हान केले.
पुरुष गटामध्ये ओमकार दरो (एम. जी. कॉलेज आरमोरी) यांनी प्रथम, स्वराज मडावी (एस. जी. एम. कॉलेज, कुरखेडा) व्दितीय व शुभम देशमुख (एम.जी. कॉलेज आरमोरी) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटामध्ये कु. पायल दुधबळे (के. एच. एम. कॉलेज चामोर्शी) प्रथम, कु. किर्ती पेंद्राम (एस. जी. एम. कॉलेज कुरखेडा) व्दितीय व कु. रेवती सातपुते (एफ. ए. एस. डब्लु कॉलेज गडचिरोली) यांनी तृतीय क्रमाकांने विजयी ठरल्या. विजेत्यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या हस्ते गोल्ड/सिल्वर/ब्रॉन्ज मेडल आणि प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तसेच सहभागी धावपटूंना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यापैकी निवडक स्पर्धेकांना १२ ऑगस्टला मुंबई येथील राज्य स्तरीय रेड रेन मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती डॉ. अभिषेक गव्हारे यांनी दिली स्पर्धेचे पंच व गुणलेखन म्हणून जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान लाभले.
डॉ. अभिषेक गव्हारे यांनी संचालन करुन आभार व्यक्त केले. तसेच जिल्हा किडा अधिकारी घटाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर उपस्थित होते तसेच आयोजनासाठी आयसीटीसी, एआरटी व विहान कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.