नागपूर समाचार : नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर, मॉडेल करियर सेंटर, नागपूर तसेच दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 2025 चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित तरुणांना रोजगार या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली.
माझ्यासमवेत यावेळी माजी राज्यमंत्री सुलेखाताई कुंभारे, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे उपायुक्त प्रकाश देशमाने, सहायक आयुक्त सुनंदा बजाज, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान, भाजप कामठी शहर अध्यक्ष मंगेश यादव, कामठी नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अजय कदम, माजी नगरसेविका वंदनाताई भगत, भाजप कार्याध्यक्ष राज हाडोंती, कपिल गायधने, चंद्रशेखर तुप्पट, राजेश खंडेलवाल, दीपंकर गणवीर , उज्वल रायबोले, राजेश देशमुख, दीपक सिरिया, लालसिंग यादव तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.