- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : “पोलीस अंमलदार अधिकाऱ्यांचा जन्मदिन केला साजरा पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कार्यालयीन दालनात”

नागपूर समाचार :- अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागपूर शहर चे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी स्थानिक अंमलदार अधिकारी यांच्याकरिता आजपासून एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी अमलदार व इतर कार्यालयीन मंत्रालयीन स्टाफ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छापत्र भेट देण्याचे योजिले आहे.

याच अनुषंगाने दि.१०/५ /२०२४ चे सायं.५.०० वा. पोलीस आयुक्त यांनी आज जन्मदिवस असणारे अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या दालनात अचानक बोलावले व त्यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छापत्र , पुष्पगुच्छ भेट करून मिठाई देऊन तोंड गोड केले.

यावेळी पोलीस आयुक्त यांनी सांगितले की ,”आज पासून आपण नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी अमलदार यांचे वाढदिवस त्यांना शुभेच्छापत्र पाठवून साजरे करण्याचा उपक्रम राबवित आहोत. यामध्ये मला आपल्या सर्व अधिकारी व अमलदार यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी बाबत अपेक्षा आहे. आपण सर्वांनी पोलीस खात्यात नोकरी करीत असताना सुखी समाधानी ,आनंदी , जीवन जगावे .योगा, व्यायाम, ध्यानधारणा करावी, शिस्तबद्ध दिनक्रम पाळावा, संतुलित आहार घ्यावा आणि छंद जोपासावा व पोलीस खात्यात नोकरी करत असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे.

या वाढदिवसाच्या अनोख्या सोहळ्याकरिता नागपूर शहर चे सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यादेखील उपस्थित होत्या. वाढदिवस साजरा करणारे अधिकारी आणि अंमलदार यांची नावे खालील प्रमाणे आहे.

१. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर परिमंडळ क्र. ४ नागपूर शहर

2. सपोनी ममता बादे पोलीस स्टेशन सिताबर्डी

3. महिला पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी काटोले -पोलीस ठाणे बजाज नगर

4. सहाय्यक पोउपनि कमल पूरबिया एमटी सेक्शन

5. पोलीस हवा. रवींद्र लांडे पोलीस ठाणे लकडगंज

6. मपोशी चित्रा नंदनवार पोलीस ठाणे पाचपावली

7. पोलीस अमलदार विनोद कांबळे पोलीस मुख्यालय

8. मंत्रालयीन अमलदार -पट्टेवाला विजय पाटणकर पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर शहर.

पोलीस आयुक्तांनी या प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने सर्व पोलीस अंमलदार अधिकारी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले व त्यांना त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याची संधी दिल्या बाबत पोलीस आयुक्तांचे आभार मानले. पोलीस अमलदार अधिकारी यांनी कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे पोलीस आयुक्तांकडून त्यांना मिळालेल्या या मानसन्माना बाबत आयुष्यात कधीही विचार केला नव्हता. याप्रमाणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. याप्रमाणे त्यांना मिळालेल्या या प्रोत्साहनामुळे आम्ही नक्कीच पोलीस दलाकरिता सकारात्मकपणे कर्तव्य बजावू असे मनोगत व्यक्त केले.

“वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा – पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *